टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, भुवनेश्वर कुमारला झाला गंभीर आजार

टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, भुवनेश्वर कुमारला झाला गंभीर आजार

भारताचा आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला गंभीर आजार झाल्यामुळं अनिश्चित काळासाठी तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : एकीकडे भारतीय संघ पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी करत आहे. तर, दुसरीकडे भारतीय खेळाडूंची दुखापत चिंतेची बाब आहे. यात 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात क्रिकेटपासून दूर असलेला जसप्रीत बुमराह कमबॅक करत असताना आता आणखी एक गोलंदाज जखमी झाला आहे. त्यामुळं विराटच्या चिंता वाढल्या आहेत.

भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या आजारी असल्यामुळं अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार आहे. भुवनेश्वर कुमारला स्पोर्टर्स हर्निया नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि आजारातून बरे होण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे का हे अद्याप ठरलेले नाही. त्याने यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला दोष दिला नाही, परंतु हर्नियाबद्दल पूर्वी का माहित नव्हते असा सवाल उपस्थित झाला आहे.

वाचा-ऑस्ट्रेलियामध्ये मैदानात दिसला ‘धोनी’ अवतार, स्टम्पिंगचा हा VIDEO पाहाच

आपल्या आजाराविषयी बोलताना भुवनेश्वर कुमारनं, “टी -20 वर्ल्ड कप सुरू होण्यास अद्याप नऊ महिने शिल्लक आहेत त्यामुळे मी त्याबद्दल विचार करत नाही. आता सर्व प्रथम मला तंदुरुस्त व्हावे लागेल आणि मी किती काळ फिट राहू हे देखील मला माहित नाही. त्यांच्या आजारपणाबद्दल एनसीएच्या भूमिकेविषयी ते म्हणाले की ते हे कसे घेतात हे बोर्डवर अवलंबून आहे”, असे सांगितले.

वाचा-एकेकाळी पाणीपुरी विकणाऱ्या मुंबईकर खेळाडूचा वाढदिवसादिवशीच आफ्रिकेत धमाका

वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या ताणमुळे बाहेर पडलेल्या भुवनेश्वरने याच महिन्यात त्यानं टी -20 मालिकेत पुनरागमन केले होते, मात्र तो पुन्हा जखमी झाला. भुवनेश्वरच्या तंदुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे देण्यात आळी आहे. भारतासाठी भुवनेश्वर कुमारनं 21 कसोटी, 114 एकदिवसीय आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळं आता टी-20 वर्ल्ड कपपर्यंत भुवनेश्वर कुमारची तंदुरुस्ती भारतासाठी महत्त्वाची आहे.

वाचा-कॅमेऱ्यामागे माझे बाबा आहेत, क्रिकेटच्या मैदानातला चिमुकलीचा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या