‘CAB लोकभावनांच्या विरोधात’, भारताच्या माजी कर्णधाराची भाजपवर टीका

‘CAB लोकभावनांच्या विरोधात’, भारताच्या माजी कर्णधाराची भाजपवर टीका

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर (Citizenship Bill Protests)राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री स्वाक्षरी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर (Citizenship Bill Protests)राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री स्वाक्षरी केली. या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. हे विधेयक मंगळवारी राज्यसभेमध्ये मंजूर झालं. तर, दुसरीकडे या विधेयकामुळे ईशान्य भारत पेटला असून तिथे हिंसक आंदोलनं सुरु आहेत. मणिपूर, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधा आणि एसएमएस सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. आता या विधेयकावर भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया यानं नाराजी व्यक्त केली आहे.

दिग्गज फुटबॉल खेळाडू बायचुंग भुतियानं निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. हामरो सिक्किम पक्षाचा संस्थापक आणि अध्यक्ष बायचुंग भुतियानं, ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक हे लोकाच्या भावनांच्या विरोधात आहे’, असे मत व्यक्त केले.

वाचा-ईशान्येकडे आगडोंब उसळला असतानाच नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं कायद्यात रुपांतर

स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या माहितीत भुतियानं, 'मी सिक्कीमच्या लोकांच्या वतीने सांगत आहे की आम्ही या विधेयकामुळे खूप निराश आहोत, कारण सिक्किमला या विधेयकातून वगळण्यात आलेले आहे. तसेच ईशान्येकडील इतर राज्यांचा अमित शाह यांनी फक्त उल्लेख केला मात्र विधेयकातून त्यांना वगळण्यात आले आहे. ही बाब खेदजनक आहे’, असे सांगत हे विधेयक सिक्किमच्या हिताचे आणि लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या कलम 371ला हानी पोहचवणारे असल्याचेही सांगितले.

वाचा-CAB विरोधी निदर्शनांना हिंसक वळण; पोलिसांबरोबरीच्या झटापटीत 2 आंदोलक ठार

'आम्ही नाराज आहोत'

आसाममधील हिंसाचाराबाबत सांगताना भुतियानं सांगितले की, ‘आमचाही तोच मुद्दा आहे जो आसाम आणि ईशान्य राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांचा आहे. सिक्कीममधील हा एक मोठा मुद्दा आहे. सिक्कीममधील मूळ रहिवासी बेपत्ता झाले आहेत आणि त्यांना सतत धोका आहे”, तसेच, आज सिक्कीममध्ये सर्वात मोठे आव्हान बेरोजगारीचे आहे. हे विधेयक सिक्किममधील लोकांच्या भावनाविरूद्ध आहे.

वाचा-'अमित शहा मुर्दाबाद'च्या घोषणा देत जाळल्या नागरिकत्व विधेयकाच्या प्रती

ईशान्येकडे आगडोंब उसळला

नागरिकता सुधारणा विधेयकाला (Citizenship amendment Bill) ईशान्य भारतातून होणारा विरोध (Citizenship amendment Bill Protests) तीव्र झाला आहे. आसाममध्ये (Assam) आंदोलकांनी हिंसक निदर्शनं केली.नागरिकता सुधारणा कायदा (Citizenship amendment Bill) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला. आता या कायदा दुरुस्तीचा मार्ग मोकळा झालेला असतानाच ईशान्य भारतातून होणारा विरोध (Citizenship amendment Bill Protests) तीव्र झाला आहे. आसाममध्ये (Assam) आंदोलकांनी हिंसक निदर्शनं केली. पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय दोघेजण गंभीर जखमी आहेत. आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) मुकेश अग्रवाल यांनी सांगितलं की गुरुवारपासून अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कामाविना नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये इंटरनेट सुविधा, मोबाईल सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. आंदोलनाला अति हिंसक वळण मिळू नये यासाठी जवानांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे ईशान्य भारतात संतापाची लाट उसळत असतानाच नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं कायद्यात रुपांतर करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 08:12 AM IST

ताज्या बातम्या