मुंबई, 29 एप्रिल: लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज(LSG vs PBKS) यांच्यातील सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे (MCA) येथे होणार आहे. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. 2 वर्षे पीबीकेएसचे कर्णधारपद भूषवल्यानंतर आज केएल राहुल त्याच्या जुन्या संघाविरुद्ध एलएसजीसाठी मैदानात दिसणार आहे.
आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेली लखनऊ टीम चांगल्या लयीत दिसत आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) विजयी षटकार मारण्यासाठी लखनऊ सज्ज आहे. तर लखनऊवर मात करून पाचव्या विजयासाठी पंजाब किंग्ज (PBKS) सज्ज आहे.
विशेष म्हणजे, लखनऊचा कर्णधार लोकेश राहुल पंजाबचा कर्णधार होता, तर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल गेल्या मोसमापर्यंत लोकेशसोबत खेळला. त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या पैलूंची पूर्ण जाणीव आहे.
IPL 2022 : रोहित- विराटच्या खराब फॉर्मवर सौरव गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, BCCI अध्यक्ष म्हणाले...
गत सामन्यातील बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मिळालेल्या रोमहर्षक विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेला पंजाब किंग्ज लखनऊच्या नवाबांना धूळ चारण्यासाठी सज्ज आहे. लखनौ संघाचे 8 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 3 पराभवांसह 10 गुण आहेत.
गुणतालिकेत पंजाब किंग्ज सातव्या स्थानी आहे. आजच्या सामन्यात शिखर धवन, लियम लिंगविस्टन, लोकेश राहुल, कगिसो रबाडा हे स्टार प्लेअर्स असतील.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला होता. केएल राहुल शिवाय दुसरा कुठलाही फलंदाज जास्त योगदान देऊ शकला नाही. लखनऊच्या संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. आवेश खान फिट असेल तर मोहसिन खानच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाईल. मोहसिनने मुंबई विरुद्ध चागंली गोलंदाजी केली होती. आवेश खानसाठी त्याला आपला जागा सोडली लागेल.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.