टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात होणार मेगा बदल! फक्त 'या' 5 खेळाडूंची जागा फिक्स

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात होणार मेगा बदल! फक्त 'या' 5 खेळाडूंची जागा फिक्स

2020 आणि 2021 वर्ल्ड कपमध्ये सध्याच्या संघातील केवळ पाच खेळाडूंना संधी मिळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : आयसीसी वर्ल्ड कप 2019मध्ये इंग्लंडनं बाजी मारली. त्यामुळं आता सगळ्यांचे लक्ष लागले आहेत ते, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये मानहानीकारक पराभव मिळाल्यामुळं आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे. यासाठी पुन्हा कोच म्हणून निवड झालेल्या रवी शास्त्री यांनी यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळं रवी शास्त्रींनी संघातून काही खेळाडूंना वगळण्याचे संकेत दिले आहेत.

पुन्हा प्रशिक्षकपदी आलेले शास्त्री 2021 पर्यंत संघाचे कोच राहणार आहे. या काळात टेस्ट चॅम्पियनशीर आणि दोन टी-20 वर्ल्ड कप अशा स्पर्धा आहेत, त्यामुळं शास्त्रींनाही स्वत:ला सिध्द करण्यासाठी या स्पर्धा जिंकाव्या लागणार आहेत. याआधी रवी शास्त्रींनी फलंदाजीमध्ये चौथ्या क्रमांकाचा खेळाडू फिक्स केला. ऋषभ पंतच्या जागी त्यांनी श्रेयस अय्यरची निवड केली. दरम्यान आता टी-20 वर्ल्ड कपसाठी सुध्दा शास्त्री यांनी संघात कोणते खेळाडू असतील याचे संकेत दिले आहेत.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, रवी शास्त्री यांनी, “2020 आणि 2021मध्ये दोन वर्ल्ड कप होणार आहेत त्याशिवाय वर्ल्ड चॅम्पियनशीपलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार”, असे सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना शास्त्री यांनी, “टी-20 एक वेगळा क्रिकेटचा फॉरमॅट आहे. सध्या संघात असलेल्या खेळाडूंपैकी चार किंवा पाच खेळाडू फक्त टी-20 साठी तंदुरूस्त आहेत. त्यामुळं हे विचारात घेऊन संघ निवड करण्यात येईल”, अशी माहिती दिली.

रवी शास्त्रींनी सांगितले चौथ्य़ा क्रमांकाच्या खऱ्या दावेदाराचे नाव

पुन्हा एकदा भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या रवी शास्त्री यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चौथ्या क्रमांकाच्या योग्य दावेदाराचे नाव सांगितले. यावेळी शास्त्री यांनी, “गेल्या दोन वर्षांपासून मी युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देत आहे. श्रेयस अय्यर सारखा फलंदाज हा चौथ्या क्रमांकासाठीच बनला आहे. आणखीही युवा फलंदाज आहेत, जे या जागेसाठी योग्य आहेत. मात्र सध्या श्रेयस अय्यर हा योग्य फलंदाज आहे”, असे सांगितले.

वाचा-आर्चरची शाळा घेणाऱ्या शोएब अख्तरला युवराजनं दाखवली जागा!

या खेळाडूंना मिळणार मिळणार टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी

टी-20 लीगमध्ये सध्याचा एकदिवसीय संघातील केवळ पाच खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यामुळं सध्याच्या संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांना पुढच्या वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार आहे. तर, इतर सर्व खेळाडू हे युवा असतील.

वाचा-BCCIच्या वादग्रस्त नियमावर आज होणार चर्चा, द्रविड-लक्ष्मण यांची होणार चौकशी

2018मध्ये 10-12 खेळाडू करतील पदार्पण

टीम इंडियाला मजबूत करण्यासाठी सध्या युवा खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल आणि विजय शंकर असे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. 2018मध्ये फक्त 10-12 खेळाडूंनी पदार्पण केले.

आव्हानांची आवड म्हणून कोच झालो

रिपोर्टनुसार, रवी शास्त्री यांनी “आव्हानांची आवड असल्यामुळं प्रशिक्षक झालो, असे सांगितले. ही एक गोष्ट मी कधीच नाही बदलली आहे. या संघाचा माझ्यावर विश्वास आहे, आम्हाला एकत्र जिंकायचे आहे”, असे सांगितले.

वाचा-अखेर रवी शास्त्रींनी सोडवला चौथ्या क्रमांकाचा तिढा, 'या' खेळाडूचं नाव फिक्स!

बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading