कर्नाटकात वाघीणीचं नाव 'हिमा', गोल्डन कामगिरीचा असाही गौरव!

कर्नाटकात वाघीणीचं नाव 'हिमा', गोल्डन कामगिरीचा असाही गौरव!

भारताची धावपटू हिमा दासने सलग पाच सुवर्ण पदके पटकावण्याची कामगिरी केली. त्यानंतर कर्नाटकात वाघीणीला तिचं नाव देऊन गौरव करण्यात आला.

  • Share this:

बेंगळुरु, 30 जुलै : आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग पाच सुवर्ण पटकावणाऱी भारताची धावपटू हिमा दासची चर्चा सर्वत्र होत आहे. तिच्यावर क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आता आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनाचे औचित्य साधून कर्नाटकातील एका प्राणीसंग्रहालयाने सहा महिन्यांपूर्वी जन्मलेल्या वाघिणीचे नाव हिमा ठेवलं आहे.

बेंगळुरुतील या प्राणीसंग्रहालयानं म्हटलं आहे की,सलग 5 सुवर्ण जिंकल्याबद्दल या वाघिणीच्या बछड्याचं नाव हिमा ठेवण्यात आलं आहे. 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा केला जातो. या दिवसाच्या आधी हिमाचे नाव वाघिणीला देण्यातं आलं आहे.

भारताची धावपटू हिमा दासने तिची सोनेरी घोडदौड कायम राखत 19 दिवसात 5 सुवर्ण पदकांवर नाव कोरलं. झेक प्रजासत्ताकमधील मेस्टो नाड मेटुजी ग्रां प्रीमध्ये 400 मीटर स्पर्धेत सुवर्ण पटकावलं. हिमानं 400 मीटर अंतर 52.09 सेकंदात पार केलं. दुसऱ्या नंबरवर भारताची वीके विस्मया होती तीने 52.48 सेकंदात हे अंतर पूर्ण केलं होतं.

हिमाने झेक प्रजासत्ताकमध्ये टबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत 17 जुलैला 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यात 23.25 सेकंदात अंतर पार करत आपली कामगिरी सुधारली होती.

13 जुलैला क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्समध्ये 200 मीटर स्पर्धेत तिसरं सुवर्ण पटकावलं होतं. यात तिने 200 मीटर अंतक 23.43 सेंकदात पार केलं होतं. हिमाने जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. पोलंडमधील कुटने अॅथलेटिक्स मीटमध्ये 7 जुलैला आणि पोझनान अॅथलेटिक्स ग्रां प्रीमध्ये 2 जुलैला सुवर्ण पदक पटकावलं होतं.

हिमा दासने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. आतापर्यंत वर्ल्ड ज्युनिअर अॅथलेटिक्समध्ये भारताला तीनच पदके मिळवता आली आहेत. यामध्ये सीमा पुनिया, नवजीत कौर धिल्लन यांना थाळीफेकमध्ये कांस्यपदक तर भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. धावपटू म्हणून सुवर्णपदक मिळवणारी पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये ती एकमेव आहे. फ्लाइंग सिख मिल्खा सिंग आणि सुवर्णकन्या पी.टी. उषा यांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती.

VIDEO: सत्तेच्या बाजूने असल्याशिवाय पर्याय नाही, राजीनाम्यानंतर शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया

Published by: Suraj Yadav
First published: July 30, 2019, 4:12 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading