• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'लांब केस कापा, मातृभाषा शिका', कोच होताच भारतीय क्रिकेटपटूचे आदेश

'लांब केस कापा, मातृभाषा शिका', कोच होताच भारतीय क्रिकेटपटूचे आदेश

बंगाल क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि पश्चिम बंगालचे माजी क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला (Laxmi Ratan Shukla) यांनी सोमवारपासून बंगालच्या (Bengal Cricket) अंडर-23 टीमचे प्रशिक्षक म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

 • Share this:
  कोलकाता, 26 जुलै : बंगाल क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि पश्चिम बंगालचे माजी क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला (Laxmi Ratan Shukla) यांनी सोमवारपासून बंगालच्या (Bengal Cricket) अंडर-23 टीमचे प्रशिक्षक म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. प्रशिक्षक होताच पहिल्याच दिवशी त्यांनी खेळाडूंसाठी कठोर नियम लागू केले आहेत. यामध्ये सोशल मीडियापासून दूर राहणं, लांब केस कापणं यांचा समावेश आहे. बंगालच्या स्थानिक क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू असलेल्या शुक्ला यांनी 2016 साली तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी जानेवारी महिन्यापर्यंत ते क्रीडा राज्यमंत्री होते. लक्ष्मी रतन शुक्ला यांना नंतर टीएमसीचा हावडा जिल्हाध्यक्ष करण्यात आलं होतं, पण मागच्या विधानसभा निवडणुकीआधी क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी त्यांनी राजकारण सोडलं. यानंतर त्यांचं बंगालच्या अंडर-23 टीमचा प्रशिक्षक म्हणून पुनरागमन झालं. 'खेळाडूंनी सोशल मीडियावर काहीही टाकू नये, त्यांना शिष्टाचार आणि अनुशासन पाळावं लागेल,' असं शुक्ला म्हणाले. 'लांब केस असलेल्या खेळाडूंना त्यांचे केस कापावे लागतील. टीममध्ये एकजूट असावी म्हणून त्यांना बंगाली शिकावी लागेल,' असा नियमही बनवण्यात आल्याचं शुक्ला यांनी सांगितलं. ज्युनियर लेव्हलवरून सिनियर टीममध्ये खेळाडूंचं येणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी ज्युनियर खेळाडूंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असं वक्तव्य शुक्ला यांनी केलं. लक्ष्मी रतन शुक्ला भारतासाठी 3 वनडे मॅच खेळले आहेत. बंगालचे जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय टीमकडून खेळावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं शुक्ला यांनी सांगितलं. मागच्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे अनेक स्पर्धा झाल्या नव्हत्या, पण यावर्षी बीसीसीआय जास्तीत जास्त स्पर्धा खेळवण्याची तयारी करत आहे. बोर्डाकडून याच्या वेळापत्रकाचीही घोषणा करण्यात आली आहे.
  Published by:Shreyas
  First published: