कोलकाता, 21 नोव्हेंबर : कोरोनामध्ये देशात होणाऱ्या सर्व स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा क्रिकेट आणि इतर स्पर्धांना सुरुवात झाली आहे. 24 नोव्हेंबरपासून सहा संघांमध्ये बंगाल टी-20 चॅलेंज (Bengal T20 Challenge) ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. हे सर्व सामने इडन गार्डनमध्ये होणार आहे. मात्र त्याआधीच या स्पर्धेवर कोरोनाचे सावट आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी केवळ 3 दिवसांचा कालावधी असताना 3 भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे.
याआधी अभिमन्यु ईश्वरन या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण झाली होती. आता आणखी 2 खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यासह या स्पर्धेत खेळणाऱ्या एकूण 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. ईस्ट बंगालचे अभिषेक रमन आणि मोहन बागानचे ऋतिक चॅटर्जीसह तीन क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आहेत.
LPL 2020 : लंका प्रीमियर लीगला आणखी एक धक्का, दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
लॉकडाऊननंतर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
रमन आणि ऋतिक यांच्याशिवाय कोलकाता कस्टम्सचे दीप चॅटर्जी आणि भ्रष्टाचारविरोधी अधिकारी पार्थ प्रतीम सेनही पॉझिटिव्ह आढळून आले आहे आहेत. मोहन बागान आणि ईस्ट बंगालसह एकूण 6 क्लबमध्ये 24 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसह इडन गार्डनवर तब्बल 8 महिन्यांनतर पहिला सामना खेळला जाईल.
वाचा-भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांचं निधन, ऑस्ट्रेलियात असल्याने भारतात येणार नाही
142 लोकांनी झाली कोरोना चाचणी
बंगाल क्रिकेट संघानं दिलेल्या निवेदनात, हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी एक दिवस आधी 142 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील 4 लोकं पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना कॅबच्या वैद्यकीय टीमकडे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या चार जणांपूर्वी सलामीचा फलंदाज अभिमन्यु ईश्वरनला कोरोनाची लागण झाली होती. या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळले जातील, ज्यासाठी 48 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मनोज तिवारी, श्रीवत गोस्वामी असे नावाजलेले खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहे.