बेन स्टोक्सनं दाबला पत्नीचा गळा? ट्विटरवर आलं सत्य समोर

बेन स्टोक्सनं दाबला पत्नीचा गळा? ट्विटरवर आलं सत्य समोर

वर्ल्ड कप 2019ना हिरो ठरलेल्या बेन स्टोक्सवर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

लंडन, 09 ऑक्टोबर : इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स पुन्हा एकदा वादामध्ये अकडला आहे. बेन स्टोक्सवर पत्नीवर हात उगारल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बेन स्टोक्स आपल्या पत्नीचा गळा दाबत असल्याचा एक फोटो व्हारयल झाला होता. त्यानंतर ट्विटरवर चाहत्यांनी स्टोक्सवर टीका करण्यास सुरुवात केली होती. आता मात्र या सगळ्या व्हायरल फोटो मागचे सत्य समोर आले आहे.

बेन स्टोक्स त्याची पत्नी क्लेअर हिचा हात पकडत, तिचा गळा दाबत असल्याचे फोटोमध्ये दिसत होते. दरम्यान क्लेअरनं याबाबत आता स्पष्टीकरण दिले आहे. हे सगळे एका पार्टीमध्ये झाल्याचे क्लेअरनं ट्विटरवर सांगितले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

वाचा-झिवानं रणवीर सिंहवर केला चोरीचा आरोप, धोनीनं दिलं स्पष्टीकरण

मात्र आता बेन स्टोक्सची पत्नी क्लेअरनं हे सगळे आरोप खोटे असल्याचे आपल्या ट्वीटनं सांगितले आहे. क्लेअरनं आपल्या ट्वीटवरून, “आम्ही एका पार्टीला गेलो होतो. तेव्हा हे सगळे घडले, मात्र या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही”, असे सांगितले. तसेच, “मला विश्वास बसत नाही आहे की, लोक एवढ्याच एवढं करतात. मी आणि बेन मजा मस्करीमध्ये तसं सगळं करत होतो. असं करत आम्ही प्रेम व्यक्त करत होतो. मात्र लोकांनी याचा खुप चुकीचा अर्थ काढला”, असे म्हणत राग व्यक्त केला.

वाचा-हरभजनने पाकिस्तानी अभिनेत्रीला शिकवले इंग्रजीचे धडे!

वर्ल्ड कप 2019ना हिरो ठरलेल्या बेन स्टोक्सनं आपल्या पत्नीचे ट्वीट रिट्वीट केले होते. दुसरकीडे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं या संदर्भात चौकशी करण्यात सुरुवात केली होती. मात्र पत्तीनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हे प्रकरण इसीबीनं सोडून दिले.

वाचा-सर्जरीनंतर पांड्या व्हिलचेअरवर... चालताना होतोय त्रास, शेअर केला VIDEO

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ben stokes
First Published: Oct 9, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading