लंडन, 30 जुलै : क्रिकेट जगतातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबतची माहिती दिली आहे. या कालावधीमध्ये तो मानसिक संतूलन व्यवस्थित ठेवायला प्राधान्य देणार आहे, आणि बोटाच्या दुखापतीवर उपचार करणार आहे, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
बेन स्टोक्स भारताविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी उपलब्ध नसेल. त्याच्याऐवजी समरसेटच्या क्रेग ओव्हरटनला संधी देण्यात आली आहे.
Official Statement: Ben Stokes
— England Cricket (@englandcricket) July 30, 2021
"Ben has shown tremendous courage to open up about his feelings and wellbeing."
We're all with you, Stokesy ❤️ pic.twitter.com/6HmEzmCxvw — England Cricket (@englandcricket) July 30, 2021
पाकिस्तानविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये स्टोक्स इंग्लंडला कर्णधार होता. या सीरिजसाठीही स्टोक्सला विश्रांती देण्यात आली होती, पण इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे मॅचच्या काही तास आधी टीममध्ये बदल करण्यात आला आणि स्टोक्सने टीममध्ये पुनरागमन करत नेतृत्व स्वीकारलं. या सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-0 ने विजय झाला.
इंग्लंड क्रिकेट बोर्ड बेन स्टोक्सच्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे, तसंच त्याला हवी ती मदत केली जाईल, असं बोर्डाने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ben stokes, Cricket, England