• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • हिशोब चुकता! बेन स्टोक्सने घेतला कार्लोस ब्रॅथवेटचा बदला, VIDEO

हिशोब चुकता! बेन स्टोक्सने घेतला कार्लोस ब्रॅथवेटचा बदला, VIDEO

टी-20 वर्ल्ड कप 2016 ची फायनल (T20 World Cup 2016) बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि इंग्लंडचे चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. वेस्ट इंडिजच्या टीमला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 19 रन पाहिजे होते आणि बॉल बेन स्टोक्सच्या हातात होता. स्ट्राईकवर कार्लोस ब्रॅथवेट (Carlos Brathwaite) होता, ज्याने स्टोक्सची धुलाई केली.

 • Share this:
  मुंबई, 29 जून: टी-20 वर्ल्ड कप 2016 ची फायनल (T20 World Cup 2016) बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि इंग्लंडचे चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. वेस्ट इंडिजच्या टीमला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 19 रन पाहिजे होते आणि बॉल बेन स्टोक्सच्या हातात होता. स्ट्राईकवर कार्लोस ब्रॅथवेट (Carlos Brathwaite) होता, ज्याने स्टोक्सची धुलाई केली. ब्रॅथवेटने स्टोक्सच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 4 सिक्स मारून वेस्ट इंडिजला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर बेन स्टोक्सचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यात तो डोक्यावर हात ठेवून बसला. हा फोटो चाहते अजूनही विसरलेले नाहीत. आता 5 वर्षानंतर 2021 साली बेन स्टोक्स आणि कार्लोस ब्रॅथवेट पुन्हा आमने-सामने आले, पण दोघांच्याही भूमिका बदलल्या. स्टोक्सच्या हातात बॅट तर ब्रॅथवेटकडे बॉल होता. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 ब्लास्टमध्ये डरहम आणि बर्मिंघम बियर्स यांच्यात सामना खेळवला गेला. या मॅचमध्ये स्टोक्सने ब्रॅथवेटची धुलाई केली. सहाव्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर बॉलिंगसाठी आला, तेव्हा स्टोक्सने ब्रॅथवेटच्या एका ओव्हरमध्ये दोन सिक्स आणि फोर लगावत 16 रन काढले. स्टोक्सच्या या खेळीनंतर चाहत्यांना 2016 वर्ल्ड कपची फायनल आठवली. या सामन्यात डरहमने बर्मिंघम बियर्सचा 34 रनने पराभव केला. डरहमने पहिले 164/8 असा स्कोअर केल्यानंतर बर्मिंघमला 130 रनवरच रोखलं. स्टोक्सने डरहमकडून खेळताना ऑलराऊंड कामगिरी केली. त्याने 20 बॉलमध्ये 35 रन केले, यानंतर 4 विकेटही मिळवल्या. या शानदार कामगिरीमुळे स्टोक्सला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
  Published by:Shreyas
  First published: