Home /News /sport /

बेx xx! विराट नेहमी काय बोलतो? बेन स्टोक्सचं हे भन्नाट उत्तर पाहाच

बेx xx! विराट नेहमी काय बोलतो? बेन स्टोक्सचं हे भन्नाट उत्तर पाहाच

भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर आयसीसीने विराटचे वेगवेगळे हावभाव असलेले फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोवर बेन स्टोक्सने दिलेला रिप्लाय चर्चेत आला आहे.

    मुंबई, 03 फेब्रुवारी : इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा क्रिकेटपटू बेन स्टोक्स गेल्या वर्षी भारतीयांच्या एका कृतीला प्रचंड वैतागला होता. त्यानं मी थकलोय असं म्हटलं होतं. त्यामागे कारण होतं भारतीय लोकांकडून त्याला ट्विटरवर मेन्शन केलं जात होतं. खरंतर त्याचं नाव तेव्हा चर्चेत येण्याचं कारण होतं विराट कोहलीने दिलेली शिवी. तेव्हा ती शिवी नसून बेन स्टोक्सचे नाव असल्याचं चाहत्यांनी म्हणत त्यालाच मेन्शन केलं होतं. बेन स्टोक्सने तेव्हा एक ट्विटही केलं होतं की, मला ट्विटर डिलिट करावं लागेल. त्याने बेन स्टोक्स एवढंच म्हटलं ( खरंतर त्याने तसं म्हटलंच नव्हतं)असे भारतीय चाहत्यांचे रिप्लाय दिसत आहेत. विराटच्या व्हिडिओवर हे मेन्शन करण्यात आलं आहे. मला याशिवाय इथं दुसरं काहीच दिसत नाही. जुने ट्विट आणि बेन स्टोक्स पुन्हा चर्चेत येण्याचं कारण आयसीसीने शेअर केलेले फोटो ठरले आहेत. भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर आयसीसीने विराटचे वेगवेगळे हावभाव असलेले फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत विराट मोबाइल कानाला लावलेला दिसत आहे. विराटचा हा फोटो ईएसपीएन क्रिकइन्फोने शेअर केला आहे. त्यात म्हटलं आहे की, जर तुम्ही विराट तुमच्यासोबत फोनवर असेल तर तुम्ही त्याच्याशी काय बोलाल? यावर अनेक कमेंट आल्या आहेत. यात पुन्हा एकदा बेन स्टोक्सला टॅग करण्यात आलं आहे. यावर बेन स्टोक्सने रिप्लाय देताना जुन्या ट्विटची आणि व्हिडिओची आठवण करून दिली. इंग्लंडच्या या क्रिकेटपटून विराटसोबत फोनवर काय बोलशील हे सांगताना म्हटलं की, बेन स्टोक्स, तुला आधीच्या गोष्टी माहिती असतील तर समजेल. यात बेन स्टोक्सचा रोख विराटने मैदानात हासडलेल्या शिवीनंतर चाहत्यांनी त्याला मेन्शन केलं होतं त्याकडे होता. केएल राहुलने विराट-रोहितला टाकलं मागे, आता पाकच्या फलंदाजाशी सामना
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या