LIVE सामन्यात बेन स्टोक्सनं रागात आपल्याच सहकाऱ्याला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

LIVE सामन्यात बेन स्टोक्सनं रागात आपल्याच सहकाऱ्याला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

एकाच संघातील दोन खेळाडूंनी भरमैदानात एकमेकांना घातल्या शिव्या.

  • Share this:

सेंच्युरिअन, 29 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) यांच्यात सेंच्यरिअन मैदानात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) फलंदाजी दरम्यानच स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि उप-कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्यात मैदानातच बाचाबाची झाली. आणि बेन स्टोक्सनं ब्रॉर्डला शिवी घातली.

स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्स यांच्यात वादविवाद

सामन्याच्या तिसर्‍या दिवशी ड्रिंक ब्रेक दरम्यान स्टोक्स आणि ब्रॉड दोघेही एकमेकांशी रागाने बोलताना दिसले. इंग्लंडचे माजी कर्णधार नसीर हुसेन यांनी यावर भाष्य केले होते. ते म्हणाले की, संघाच्या गदारोळात ब्रॉडने असे काही बोलले ज्यामुळे स्टोक्स खुश नव्हता. नासरने समालोचन करताना, 'मला वाटते ब्रॉड आणि स्टोक्स यांच्यात काहीतरी घडले आहे. ब्रॉडने असे काही बोलले ज्यामुळे संघाचा उप-कर्णधार स्टोक्स आनंदी नव्हता. त्याचवेळी वेस्ट इंडीजचा अनुभवी मायकेल होल्डिंग, जो नासेरशी भाष्य करीत म्हणाला, 'दोघेही मित्रांसारखे बोलत नाहीत. हे कोणी सुरू केले ते मला माहित नाही परंतु हा वाद लवकर संपायला हवा’, असे सांगितले.

वाचा-एकेकाळी पाणीपुरी विकणाऱ्या मुंबईकर खेळाडूचा वाढदिवसादिवशीच आफ्रिकेत धमाका

वाचा-कॅमेऱ्यामागे माझे बाबा आहेत, क्रिकेटच्या मैदानातला चिमुकलीचा VIDEO VIRAL

दक्षिण आफ्रिकेची जोरदार सुरुवात

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 376 धावांचे आव्हान इंग्लंड समोर ठेवले होते. रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ली यांच्यातील सलामीच्या भागीदारीमुळे हा धावांचा डोंगर उभा करण्यात आला. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडने एक विकेट गमावत 121 धावा केल्या होत्या. तर चौथ्या दिवशी इंग्लंडनं सलग 2 विकेट गमावल्या. त्यामुळं आता मैदानात जो रुट आणि बेन स्टोक्स फलंदाजी करत आहेत.

वाचा-'तो विराटसोबत बोलला', धोनीबद्दल गांगुलीचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2019 03:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading