बेन स्टोक्सनं सांगितला त्याचा आवडता हिंदी शब्द अन् चाहत्यांना आली विराटची आठवण, पाहा VIDEO

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ऑल-राउंडर बेन स्टोक्स यांची नुकतीच एक मजेदार रॅपिड-फायर मुलाखत झाली.

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ऑल-राउंडर बेन स्टोक्स यांची नुकतीच एक मजेदार रॅपिड-फायर मुलाखत झाली.

  • Share this:
    नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेतील दोन नायक बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली. रविवारी कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला खरा, मात्र राजस्थान रॉयल्ससाठी हे सर्वोत्तम परदेशी खेळाडू ठरले. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ऑल-राउंडर बेन स्टोक्स यांची नुकतीच एक मजेदार रॅपिड-फायर मुलाखत झाली. यामध्ये दोघांनी एकमेकांना गमतीदार प्रश्न विचारले आणि दोघांनीही त्याची जबरदस्त उत्तरंही दिली. दोघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर याला खूप दाद दिली. त्यांच्या गोलंदाजीतील आदर्श खेळाडूपासून ते त्यांच्या आयुष्यावर सर्वांधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीपर्यंत, ते अगदी सकाळी उठल्यानंतर ते पहिल्यांदाच कोणतं काम करतात, असे सर्व प्रश्न त्या रॅपिड-फायर मध्ये होते, ज्यामुळे यूएईमध्ये ऑन-फिल्ड सुरू असलेल्या संघर्षातून त्यांना एक मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली. वाचा-बॅटिंग नाही तर जाडेपणाची स्पर्धा! युवराजनं उडवली रोहित-पंतची खिल्ली या प्रतिभावान जोडीसाठी अडचणीत आणणारे प्रश्नही काढले होते आणि या प्रश्नांतून दोघांच्या व्यक्तिमत्वांची दुसरी बाजूही प्रेक्षकांसमोर आली जी त्याआधी कधीच आली नव्हती. वाचा-सॅम्युअल्सनं VIDEO शेअर करत इंग्लंड संघातील खेळाडूंच्या पत्नीवर केली टीका त्यातून एक प्रश्न असा होता जो काही भलत्याच कारणांनी लोकप्रिय ठरला. स्टोक्सने आर्चरला विचारलं: "तुझा आवडता हिंदी शब्द कोणता आहे?" पुढे तो लगेच म्हणाला "तुम्हाला हे सांगता येईल याची खात्री नाही." आर्चर ही सहमत झाला आणि त्याने असे उत्तर दिले: "हो, नाही मी सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही." त्यानंतर आर्चरने त्याचा नेहमी बोलला जाणारा एक हिंदी शब्द उघड सांगितलं, "जल्दी". आर्चरने स्टोक्सला त्याच्या आवडत्या शब्दाची पटकन आठवण करून दिली, "तू बेन स्टोक्स ही म्हणू शकतोस", ज्यावर स्टोक्स म्हणाला, "माझं नाव हिंदी भाषेतील एक शब्द झालं आहे." त्यांचा हा संवाद यूट्यूबवर लगेचच व्हायरल झाला. वाचा-IPL 2020 : पंजाबनंतर राजस्थानही आयपीएलमधून बाहेर, कोलकात्याचा दणदणीत विजय गेल्या वर्षी स्टोक्सनी जाहीरपणे म्हटलं होतं की दरवेळी ट्विटमध्ये (विशेषत: भारतीयांकडून) त्या शब्दाचा उल्लेख केला जातो त्यामुळे तो "वैतागला" आहे. त्यानी असं लिहिलं होतं की भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा मैदानात आनंद साजरा करतो तेव्हा हा हिंदीतील शब्द (शिवी) जोराने उच्चारतो. या शिवीतील शब्द आणि बेन स्टोक्सचं नाव याचं यमक जुळतं, असं मजेदार ट्वीट केलं होतं.
    Published by:Priyanka Gawde
    First published: