वॉटर्लू, 12 मे: जर्मनी आणि बेल्जियम या देशांची नावे ऐकताच समोर येते तो त्याचा फुटबॉल अथवा हॉकीचा संघ. या दोन्ही देशांनी फुटबॉल आणि हॉकीमध्ये मोठी जेतेपद मिळवली आहेत. पण जर्मनी आणि बेल्जियम क्रिकेट खेळतात असे कोणी सांगितले तर कदाचित त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आशियाई देशात क्रिकेट लोकप्रिय आहे. भारतासारख्या देशात क्रिकेटचे वेड प्रंचड आहे. या उलट चित्र युरोपमधील आहे. येथे फुटबॉल चाहत्यांची संख्या मोठी आहे. अशा युरोपमध्ये शनिवारी क्रिकेटचा एक आंतरराष्ट्रीय सामना झाला आणि संघ होते जर्मनी विरुद्ध बेल्जियम...
बेल्जियममधील वॉटर्लू येथील मैदानावर या दोन्ही संघाने आंतरराष्ट्रीय टी-२०चा सामना खेळला. विशेष म्हणजे ११ मे रोजी या दोन्ही संघांनी एक नव्हे तर दोन टी-२० सामने खेळले. यातील पहिल्या सामन्यात जर्मनीने 9 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात 62 धावांनी विजय मिळवला. अर्थात या दोन्ही संघातील अधिकतर खेळाडू मुळचे आशियाई देशातील होते.
पहिल्या टी-२० सामन्यात बेल्जियमने नाणेफेक जिंकून जर्मनीला फलंदाजीस बोलवले. रोहित सिंह (39), मदस्सर मोहम्मद (29) आणि अमित शर्मा (27) यांच्या खेळाच्या जोरावर जर्मनीने 20 षटकात 7 बाद 128 धावा केल्या. बदल्यात बेल्जियम संघाला 119 धावा करता आल्या. दुसऱ्या टी-20 सामन्यात जर्मनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकात 149 धावा केल्या. यात विजय शंकर याने 22 चेंडूत 40 धावा तर आमिर खानने 20 चेंडूत 40 धावा केल्या. 150 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बेल्जियमला 87 धावा करता आल्या.
A great start to life as an @ICC T20i nation as we win the first 2 games against a strong Belgium team. The first game was tight, the second one more comfortable. Special mention to debutant and former Afghan international Amir Mangal who scored a great 40 not out off 20 balls
— Cricket Germany 🏏 (@Cricket_Germany) May 11, 2019
वॉटर्लू मैदानात झालेल्या या दोन सामन्यामुळे जर्मनी आणि बेल्जियम या दोन्ही देशांच्या नावावर क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय सामना खेळल्याची नोंद झाली आहे.
VIDEO : काँग्रेसला किती जागा मिळणार? मतदान केल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतक्रिया