धक्कादायक! रेसिंग ट्रॅकवर झाला विचित्र अपघात, 22 वर्षांच्या खेळाडूचा आश्चर्यकारकरित्या मृत्यू

बेल्जियममध्ये होत असलेल्या सायकलिंग टूर टी पोलंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 06:49 AM IST

धक्कादायक! रेसिंग ट्रॅकवर झाला विचित्र अपघात, 22 वर्षांच्या खेळाडूचा आश्चर्यकारकरित्या मृत्यू

पोलंड, 06 ऑगस्ट : बेल्जियममध्ये होत असलेल्या सायकलिंग टूर ऑफ पोलंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. 22 वर्षीय खेळाडू ब्योर्ग लॅंबरेच्ट याचा तिसऱ्या फेरीत विचित्र अपघात झाला. दरम्यान त्याला लगेचच हेलिकॉप्टरच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बेल्जियम संघानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही बातमी देण्यात आली आहे. "ब्योर्गचा परिवार, मित्र आणि टीमसोबत जे घडले ते वाईट आहे. आम्ही या परिस्थितीत त्यांच्यासोबत आहेत. ब्योर्गच्या परिवारासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून आहोत", असे ट्वीट करण्यात आले.

तर या स्पर्धेच्या आयोजनकर्त्यांनी, "आमच्याकडे शब्द नाही आहेत, ही घटना फार वाईट आहे. रेस सुरू असताना, हा अपघात झाला. आम्ही त्यांच्या परिवारासोबत आहोत", असे ट्वीट केले.

ब्लोर्ग यांची प्रोफेशनल स्थरावरची ही दुसरी रेस होती. जूनमध्ये त्याची उद्योन्मुख खेळाडू म्हणून घोषणा करण्यात आली होती. 2015मध्ये तो ब्लेजियम नॅशनल ज्यूनिअर चॅम्पियन स्पर्धाही जिंकला होता. या रेसमध्ये ग्लेन वान दुसऱ्या तर गुलेरट्स तिसऱ्या क्रमांकावर होता.

ब्योर्गनं 2016मध्ये Ronde de l'Isardच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला होता. मात्र शेवटच्या रेसमध्ये मॅनेजमेंटच्या एका चुकीमुळे त्याला बाहेर करण्यात आले. त्यानंतर ज्यूरींनी आपली चूक मान्य करत त्याला आणखी एक संधी दिली होती. त्यानंतर यानिक आणि लुईस वेरवेके यांच्यासोबत ब्योर्ग पुन्हा रेसमध्ये सामिल झाला आणि त्यानं ही रेस जिंकली. अशी कामगिरी करणारा ब्योर्ग तिसरा खेळाडू ठरला होता.

VIDEO : लोकसभेत असं काय बोलल्या नवनीत राणा की, अमित शहांनाही आलं हसू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2019 06:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...