वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तानच्या फलंदाजांची अवस्था बिकट, आर्यलॅंडनं दिला मोठा झटका

विश्वचषकात प्रबळ दावेदार संघांना कडवी झुंज देईल अशी अपेक्षा असताना, याच संघाला आर्यलॅंडनं मोठा धक्का दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 04:45 PM IST

वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तानच्या फलंदाजांची अवस्था बिकट, आर्यलॅंडनं दिला मोठा झटका

नवी दिल्ली, 20 मे : एकीकडं विश्वचषकाला केवळ 10 दिवस उरले असताना, इंग्लंडनं पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात नमवत आपणचं प्रबळ दावेदार असल्याचे सिध्द केले. तर, आता दुसरीकडं अफगाणिस्तानला आर्यलॅंडनं मोठा झटका दिला आहे. अफगाणिस्तानच्या संघाला आर्यलॅंड विरोधात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं पहिल्याच सामन्यात आर्यलॅंडनं अफगाणिस्तानला 72 धावांनी नमवत 1-0नं मालिकेत आघाडी घेतली आहे.

बेलफास्टच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रथम टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार गुलबदीन नायब यांनं घेतलेला निर्णय अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सार्थकी ठरवला. 35 धावातच त्यांनी आर्यलॅंडचे दोन फलंदाज बाद केले. मात्र, त्यानंतर विल्ययम पोर्टरफील्ड आणि पॉल स्टिर्लिंग यांनी 99 धावांची भागीदारी केली. याच भागीदारीच्या जोरावर आर्यलंडनं 48.5 षटकात 210 धावा केल्या.

210 या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना, अफगाणिस्तानच्या एकही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही, सलामीला आलेला अहमद शहजार याला केवळ 2 धावा करता आल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाचा आर्यलॅंडच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. दरम्यान अफगाणिस्तानचा संपुर्ण संघ 138 धावांच बाद झाला. त्यामुळं विश्वचषकाआधी झालेल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात 72 धावांनी मिळालेला हा पराभव संघाच्या जिव्हारी लागणारा असणार आहे. दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना 21 मे रोजी खेळला जाणार आहे. आयपीएल गाजवणारे रशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्याकडून संघाला सर्वात जास्त अपेक्षा आहेत.

अफगाणिस्तानच्या संघाला 2009 साली एकदिवसी सामन्यांचा दर्जा देण्यात आला होता. या संघात युवा खेळाडूंचा भरणा असल्यामुळं हा संघ विश्वचषकात चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा असताना हा पराभव अफगाणिस्तानला महागात ठरणार आहे. अफगाणिस्तानचा संघ 2015चा विश्वचषक आणि 2018चा आशियाई कप खेळला आहे. त्यामुळं आर्यलंडकडून पराभव स्विकारावा लागला असला तरी, या संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल कुंबळे म्हणतो अफगाणिस्तानचाच संघ भारी

Loading...

दरम्यान याआधी भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे यानं इंग्लंड आणि भारत हे जरी, विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असले तरी त्यांना एका संघापासून धोका असणार आहे. अफगाणिस्तानचा संघ पाहिल्यास त्यांनी 2009पासून आतापर्यंत खुप चांगली कामगिरी केली आहे. या संघातील खेळाडू वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये खेळतात. त्यामुळं त्यांना इतर फलंदाजांचे विकपॉईंट माहित आहेत. रशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्यावर या संघाची मदार आहे. मात्र फलंदाजीमध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

वाचा- World Cup : पंचांना एका सामन्यासाठी दिलं जातं इतकं वेतन

वाचा- इंग्लंडकडून लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल

वाचा- वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय संघाचा आहे 'मास्टर प्लॅन', सराव नव्हे तर 'ही' आहे योजना!


VIDEO : जिंकणार की हरणार? एक्झिट पोलवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...