सासू-सासऱ्यांकडून विराट कोहलीला मिळणार अनोखं गिफ्ट!

सासू-सासऱ्यांकडून विराट कोहलीला मिळणार अनोखं गिफ्ट!

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला 'व्हॅलेंटाइन्स डे'चं अनोखं गिफ्ट मिळणार आहे.

  • Share this:

10 फेब्रुवारी : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला 'व्हॅलेंटाइन्स डे'चं अनोखं गिफ्ट मिळणार आहे. अनुष्काची आई आशिमा शर्मा आणि वडिल अजय कुमार शर्मा दोघांनाही एक सुरेख भेटवस्तू देणार आहेत.

अनुष्काच्या आईवडिलांनी एका पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी प्रेमकवितांचं पुस्तक विकत घेतलं. हे पुस्तक विरुष्काला भेटवस्तू म्हणून देणार असल्याचं अनुष्काच्या आईवडिलांनी यावेळी स्पष्ट केलं. एकुणच काय तर अनुष्का-विराटसाठी लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाइन्स डे' खास ठरणार एवढं नक्की.

विराट कोहलीला कविता वाचायला खूप आवडतात. त्याने त्यांच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांना सूफी संत रूमी यांच्या कवितांचे संग्रह वाटले होते. सध्यातरी विराट कोहली टीम इंडियासोबत दक्षिण अफ्रिकेत क्रिकेट सामन्यांमध्ये व्यस्त आहे. आणि अनुष्का शर्मा तिच्या आगामी सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहेत.

First published: February 10, 2018, 5:43 PM IST

ताज्या बातम्या