Home /News /sport /

मोदी, रजनीकांतनंतर बेअर ग्रिल्सचं आता ‘विराट’ अ‍ॅडव्हेंचर?

मोदी, रजनीकांतनंतर बेअर ग्रिल्सचं आता ‘विराट’ अ‍ॅडव्हेंचर?

‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या सुपरहीरोनं व्यक्त केली विराटसह शो करण्याची इच्छा

    मुंबई 02 ऑगस्ट: डिस्कव्हरी चॅनेलवरचा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ हा शो चांगलाच प्रसिद्ध आहे. या शोमध्ये बेअर ग्रिल्स हा ब्रिटिश एअरफोर्समधला माजी कमांडो एखाद्या निर्जन ठिकाणी अडकल्यास त्यातून सहीसलामत कसं बाहेर पडू शकतो याची माहिती देतो. जगभरातल्या अनेक देशात जाऊन बेअरनं याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं आहे. प्रेक्षकांकडून बेअरच्या या शोला भरभरुन दादही मिळाली. गेल्या काही वर्षात बेअरनं ‘इन टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’ आणि ‘रनिंग वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’ नव्या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित केलं होतं. त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अभिनेता मायकल जॉर्डन, केट विन्स्लेट यांनीही बेअरच्या शोमध्ये हजेरी लावली होती. भारतात बेअर ग्रिल्स हे नाव तेव्हा चर्चेत आलं जेव्हा त्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं. मोदींनीही बेअरचं हे आमंत्रण स्वीकारुन त्याच्यासोबत खास जंगल सफारी केली होती. पण आता बेअरनं भारतातल्या एका खास सेलिब्रिटीला आपल्या शोमध्ये घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आणि तो सेलिब्रिटी आहे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली. CWG 2022: वडिलांचं अधुरं स्वप्न मुलाकडून पूर्ण; 'या' एका गोष्टीमुळे जेरेमी वळला वेटलिफ्टींगकडे एक धडाकेबाज फलंदाज, भारताचा एक यशस्वी कर्णधार, फिटनेस आयकॉन अशी विराटची ख्याती आहे. अनेकजण त्याला आपला रोल मॉडेल मानतात. सोशल मीडियातही त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. आणि म्हणूनच बेअरला विराट आपल्या शोमध्ये यावा असं वाटतंय. नुकतच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बेअरनं “सिंहाचं काळीज असलेल्या विराटसह अ‍ॅडव्हेंचर करणं अद्भुत असेल” असं म्हटलंय. याआधी पंतप्रधान मोदींसह रजनीकांत, अक्षय कुमार आणि अजय देवगण हे भारतीय सेलिब्रिटी बेअरच्या शोमध्ये दिसले होते. 'या' भारतीय महिला खेळाडू आहेत खूपच सुंदर, दिसण्यात अभिनेत्रींनाही देतात टक्कर बीसीसीआय विराटला परवानगी देणार? बेअर ग्रिल्सच्या विधानावर विराटनं अद्याप तरी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण विराटचा बीसीसीआयशी करार आहे. त्यामुळे अशा शोमध्ये सहभागी होण्यासाठी बीसीसीआय त्याला परवानगी देणार का? हाही प्रश्नच आहे. पण क्रिकेटचं मैदान गाजवणारा विराट बेअर ग्रिल्ससोबत अ‍ॅडव्हेंचर करताना पाहणं चाहत्यांना नक्कीच आवडेल.
    First published:

    Tags: BCCI, Cricket, Virat kohli

    पुढील बातम्या