बंगळुरू, 29 मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि चांगलाच गाजला. लसिथ मलिंगाच्या शेवटच्या षटकात बंगळुरूला सहा चेंडूत सामना जिंकण्यासाठी १७ धावांची गरज होती. काही क्षणासाठी मुंबईच्या हातून हा सामना गेला असं वाटत होता. अगदी शेवटच्या चेंडूत बंगळुरूला सात धावांची गरज होती. मलिंगाचा शेवटचा चेंडू नो- बॉल होता. मात्र मलिंगाची ती चुक पकडण्यात पंच सुंदरम रवी यांना अपयश आहे.
यानंतर रवी यांच्या त्या चुकीवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. पण, यानंतरही पंचावर कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे. याबाबत आता बीसीसीआयकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
The quality of umpiring over the years and especially that last ball mistake shows the importance of legends like Simon Taufel and Billy Bowden. That was so painfully absurd to watch. Don't you think this needs to be addressed with immediate effect? #RCBvsMI#noballpic.twitter.com/sQdnjI3ZKO
सध्याच्या आयपीएलच्या 12व्या हंगामातील एकूण 56 सामन्यांकरिता मैदानावरील आणि टिव्ही अशा एकून 11 भारतीय पंचांची नेमणूक करण्यात आली आहेत. त्यामुळे पंच रवी यांच्या या चुकीकरिता त्यांना नकारात्मक गुण दिले जातील मात्र बीसीसीआय कठोर कारवाई करू शकत नाही.
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या वतीनं सध्या 17 पंचाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी 11 भारतीय आणि 6 परदेशी पंच आहेत. याशिवाय 6 भारतीय पंच चौथ्या पंचाच्या भूमिकेत करतात. त्यामुळं पंचाची कमतरता असल्यामुळं बीसीसीआयला पंचावर कारावाई करणं परवडणार नाही.
रवी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलिट पॅनलवर असलेले एकमेव भारतीय पंच आहेत. त्यांनाच मलिंगाचा तो नो-बॉल पकडण्यात अपयश आले. यावर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कारण या एका चेंडूमुळं बंगळुरूनं 6 धावांनी हा सामना गमावला. मुंबईने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या टीमनेही जोरदार लढत दिली. परंतु त्यांना मुंबईने दिलेल्या आव्हान गाठणं शक्य झालं नाही. बंगळुरूचा डाव 20 षटकांत पाच बाद 181 धावांवर आटोपला. अखेर मुंबईने 6 धावांनी विजय मिळवला.
VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग