बीसीसीआय पंचांवर 'मेहरबान', दार तोडूनही नाममात्र कारवाई

बीसीसीआय पंचांवर 'मेहरबान', दार तोडूनही नाममात्र कारवाई

एकीकडं खेळाडूंनी केलेल्या कृत्यांवर कारवाई करणारी बीसीसीआय मात्र यंदा पंचाच्या चुकांकडे दुर्लक्ष करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 मे: एकीकडं खेळाडूंनी केलेल्या कृत्यांवर कारवाई करणारी बीसीसीआय मात्र यंदा पंचाच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसत आहेत. याआधी नो बॉल असो किंवा इतर चुकीच्या निर्णयांमुळं आयपीएलचं बारावं हंगाम चांगलच गाजतय. दरम्यान यावेळी पंचांनी घेतलेले निर्णय आणि त्यामुळं बदलणारे सामने यावर बीसीसीआय काही विशेष कारवाई करताना दिसत नाही आहे.

असाच काहीसा प्रकार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात घडला. या सामन्यादरम्यान पंच नायजेल लोंग आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचा सगळा राग सामन्यानंतर पंच नायजेल लोंग यांनी आपला राग खोलीच्या दरवाज्यावर काढला होता. दरम्यान बीसीसीआय या प्रकरणावर काय कारवाई करते याकडं सगळ्यांचं लक्ष असताना, बीसीसीआयनं कारवाई शक्यता नाकारली नसली तरी, आयपीएलच्या अंतिम सामन्यातून त्यांना हटविणार नसल्याचे स्पष्ट केले.

वाचा-IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

या सामन्यादरम्यान, विराट व लोंग यांचा मैदानावर वाद झाला होता. सामन्यादरम्यानच्या विश्रांतीवेळी लोंग यांनी रागाच्या भरात दरवाजावर लाथ मारली होती. या प्रकरणी त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कर्नाटक राज्य क्रिकेट मंडळाचे सचिव सुधाकर राव यांनी सांगितले की, पंचांनी नुकसान भरपाई दिलेली आहे. त्याच्याकडून 5 हजारांची नुकसान भरपाई घेण्यात आली. दरम्यान, लोंग यांची तुलना जगातील चांगल्या पंचांशी केली जाते. त्यांनी 56 कसोटी, 123 एकदिवसीय सामने तर, 32 टी-20 सामन्यात पंचाची भुमिका केली आहे.

वाचा- IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

First published: May 8, 2019, 4:17 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading