IND vs NZ 2nd Test : भारत न्यूझीलंड सामन्याआधी खेळपट्टी झाली गायब? BCCIने शेअर केला फोटो

IND vs NZ 2nd Test : भारत न्यूझीलंड सामन्याआधी खेळपट्टी झाली गायब? BCCIने शेअर केला फोटो

भारत-न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथील हेगली ओव्हल मैदानावर होणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0ने आघाडी घेतली आहे.

  • Share this:

क्राइस्टचर्च, 28 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथील हेगली ओव्हल मैदानावर होणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0ने आघाडी घेतली आहे. त्यामुळं क्लिन स्वीप टाळण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र या सामन्याआधी चक्क खेळपट्टीच गायब झाल्याचा प्रकार घडला. बीसीसीआयनं फोटो ट्वीट करत ही माहिती दिली.

क्राइस्टचर्च मैदानावर भारताचा इतिहास चांगला राहिलेला नाही आहे. त्यामुळं 29 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मात्र या सामन्याआधी बीसीसीआनं एक फोटो ट्वीट केला. यात त्यांनी चाहत्यांना खेळपट्टी शोधायला सांगितले. या फोटोमध्ये फक्त गवत दिसत असल्याने 22 यार्डची खेळपट्टी दिसत नाही आहे.

वाचा-टीम इंडियात मतभेद? ‘या’ खेळाडूसाठी अजिंक्य रहाणेने घेतला कॅप्टन कोहलीशी पंगा

वाचा-दुसऱ्या सामन्याआधी विराटला मोठा धक्का! स्टार फलंदाज झाला जखमी

हेगली ओव्हल खेळपट्टीवर भारतीय संघाची बारीक नजर असेल. वेलिंग्टनमधील झालेल्या पराभवाचा बदला म्हणून संघ येथे जिंकू इच्छित आहे. भारतानं या मालिकेत विजय मिळवल्यास मालिका बरोबरीत सुटेल. याआधी बेसिन रिझर्व्हच्या वेगवान आणि तेजीच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागला.

मयंक अग्रवाल आणि काही प्रमाणात अजिंक्य रहाणे या विकेटवर काही विकेट्स खेळू शकले. विराट कोहली, पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांना ट्रेंट बाउल्ट, टिम साऊदी आणि काइल जेम्सनच्या चेंडूंचा सामना करण्यास खूप त्रास झाला होता. आता किवी संघाचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने दुसऱ्या कसोटीपूर्वी, दुसऱ्या सामन्यातही बाऊन्स आणि वेग हे संघाचे मुख्य शस्त्रे असतील, असे सांगितले होते. त्यामुळं भारतासाठी अडचणी वाढू शकतील. भारताने हा सामना गमावल्यास आयसीसी कसोटी वर्ल्ड कपमधील हा भारताला पहिला मालिका पराभव असेल.

वाचा-एका व्हिडिओमुळं संपली बुमराहची दहशत! न्यूझीलंडच्या फलंदाजांनी असा काढला मार्ग

पुजारावरून कोहली-रहाणेमध्ये मदभेद?

या सामन्याआधी कर्णधार आणि उपकर्णधारात वाद असल्याचे समोर आले आहे. चेतेश्वर पुजाराच्या मुद्द्यावरून रहाणे आणि कोहली आमने सामने आले आहे.विराट कोहलीनं वेलिंग्टन कसोटीमध्ये धिम्या गतीनं फलंदाजी केलेल्या पुजारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रहाणेनं पुजाराची बाजू घेतली आहे. रहाणेनं सांगितले की, “पुजारा पूर्णत: प्रयत्न करत आहे की तो आपल्या धावांवर लक्ष केंद्रित करेल. मात्र बोल्ट, साऊदी यांसारख्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळं पुजारावर टीका करणे योग्य नाही”. पहिल्या कसोटी सामन्यात पुजाराला मोठी खेळी करता आली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Feb 28, 2020 09:53 AM IST

ताज्या बातम्या