BCCI च्या बरखास्त प्रशासकीय समितीच्या सदस्यांना मिळणार इतके कोटी!

BCCI च्या बरखास्त प्रशासकीय समितीच्या सदस्यांना मिळणार इतके कोटी!

बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पदभार स्विकारताच सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेली प्रशासकीय समिती बरखास्त होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती होणार आहे. यानंतर प्रशासकांची समिती बरखास्त होईल. सध्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि त्यांची सहकारी डायना एडुल्जी यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच संपेल. विनोद राय आणि डायना एडुल्जी यांची नियुक्ती 2017 मध्ये करण्यात आली होती. त्यांच्यासोबतचे रामचंद्र गुहा आणि विक्रम लिमये यांनी आधीच राजीनामा दिला आहे.

प्रशासकीय समितीच्या सर्व सदस्यांना 2017 साठी दरमहा दहा लाख रुपये, 2018 साठी दरमहा 11 लाख आणि 2019 साठी दरमहा 12 लाख रुपये देण्यात येतील. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, याबाबत पीएस नरसिम्हा यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम रक्कम ठरवण्यात येईल. करारानुसार डायना एडुल्जी आणि विनोद राय यांनी प्रत्येकी 3 कोटी 50 लाख रुपये मिळतील. तर विक्रम लिमये, रामचंद्र गुहा आणि रवि थोडगे यांना त्यांच्या कार्यकाळानुसार पैसे दिले जातील.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आदेश दिले की, बीसीसीय़आच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार सांभाळताच विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती हटवण्यात यावी. बुधवारी सौरव गांगुलीची बीसीसीआय अध्यक्ष म्हणून घोषणा करणे बाकी आहे. गांगुली अध्यक्ष तर गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा सचिव होईल. याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.

SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BCCI
First Published: Oct 23, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या