राहुल द्रविड होणार सुपर गुरू! भारत नाही तर ‘या’ देशातील खेळाडूंना देणार ट्रेनिंग

राहुल द्रविड होणार सुपर गुरू! भारत नाही तर ‘या’ देशातील खेळाडूंना देणार ट्रेनिंग

टीम इंडियाला अनेक युवा खेळाडू देणारा द्रविड आता इतर देशांच्या खेळाडूंना देणार क्रिकेटचे धडे.

  • Share this:

बंगळुरू, 17 ऑक्टोबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष आहे. त्याचबरोबर याआधी राहुल द्रविडनं भारतीय अंडर-9 आणि भारतीय अ संघाला प्रशिक्षण दिले आहे. द्रविडमुळं भारताला अनेक युवा खेळाडू मिळाले आहेत. दरम्यान आता द्रविड इतर 16 देशांच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे.

बीसीसीआयच्या वतीनं भारतात इतर 16 देशांच्या युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यात येणार आहेत. यासाठी गुरू म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. लंडनमध्ये भारत सरकारानं कॉमवेल्थ बैठकित हा निर्णय घेतला. 19 एप्रिल 2018मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 देशांच्या मुला-मुलींना भारतात क्रिकेट ट्रेनिंगसाठी आमंत्रित केले होते. मोदींनी लंडन येथे, या मुला-मुलींच्या राहण्याची तसेच, ट्रेनिंग कॅंपची सुविधा भारत सरकार करणार आहे.

वाचा-‘हा प्रश्न मोदी आणि इमरान यांना विचारा’, गांगुलीच्या वक्तव्यानं खळबळ

त्यामुळं शासनानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणे राहुल द्रविड या खेळाडूंनी प्रशिक्षण देणार आहे. बंगळुरू येथे पुढच्या वर्षी 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे.

बीसीसीआयनं नरेंद्र मोदी, विदेश मंत्रालय आणि क्रिडा मंत्रालयाशी चर्चा करून 16 देशांतील 18 मुले आणि 17 मुलींची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या 16 देशांमध्ये बोस्तवाना, कॅमरून, केनिया, मोजांबिक्यू, मॉरिशस, नामिबिया, नायझेरिया, रावांडा, युगांडा, जांबिया, मलेशिया, जमॅका, त्रिनिदाद आणि टोबागो, फुजी आणि तन्जानिया अशा देशांचा समावेश आहे.

वाचा-क्रिकेटमध्ये झाला मोठा भ्रष्टाचार, ICCने कर्णधारासह तीन खेळाडूंना केले निलंबित

द्रविडवर झाला होता परस्पर हितसंबंध जोपासल्याचा आरोप

याआधी भारताच्या या दिग्गज खेळाडूवर परस्पर हितसंबंध जोपासल्याचा आरोप करण्यात आला होता. द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. यावर द्रविडनं आपल्या लेखी जबाबात, ‘‘मी इंडिया सिमेंट कंपनीकडून बिनपगारी सुट्टी घेत भारतीय क्रिकेटसाठी कार्यरत आहे. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जशी आमचा कोणताही संबंध नाही.’’, असे स्पष्ट केले होते.

वाचा-एका अपूर्ण शतकासाठी सेहवागला आजही मागावी लागते कुंबळेची माफी

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2019 04:34 PM IST

ताज्या बातम्या