नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: क्रिकेट जगतात टीम इंडियाला (Team India) नवा कॅप्टन मिळण्याच्या चर्चेला उत आला आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाच्या T20 फॉरमॅटचा (T20) नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहीली(Virat Kohli) कॅप्टनच्या पदावरुन पायउतार झाला. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील सिरीज 17 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये संघाला वनडे फॉरमॅटचा नवा कर्णधारही मिळू शकतो. याबाबत बीसीसीआय लवकरच कोहलीशी चर्चा करणार असल्याचे क्रिकेट जगतात सांगण्यात येत आहे.
विराट कोहलीने कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त होऊन फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे, अशी बोर्डाची इच्छा आहे. कोहली खराब फॉर्ममध्ये नसला तरी 2019 पासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.
जानेवारीमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर वन डे सिरीजसाठी (India vs South Africa) जाणार आहे. दरम्यान, रोहित शर्माकडे टी-20 संघानंतर वन डे संघाची कमान सोपवली जाऊ शकते. केएल राहुलला टी-20 नंतर वन डे संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते.
11 जानेवारीपासून वन डे सिरीज सुरू होत आहे.टीम इंडिया डिसेंबरमध्ये तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. राहुल द्रविडला संघाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या सूत्रानुसार, विराट कोहलीने मर्यादित षटकांच्या ओझ्यातून मुक्त होऊन त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे, अशी बोर्डाची इच्छा आहे. जेणेकरून त्यांना त्यांचा जुना जबरदस्त फॉर्मात तो पुनरागमन करेल.
विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सिरीज आणि पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये तो पुनरागमन करणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली नाही. हा संघ सुपर-12 मधूनच बाहेर पडला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. 14 नोव्हेंबरला विजेतेपदाचा सामना होणार आहे.
मात्र, विराट कोहली टेस्ट संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार आहे. विराट कोहलीच्या एकदिवसीय विक्रमाबद्दल बोलायचे तर, त्याने 95 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. टीम इंडियाने 65 मॅच जिंकल्या आहेत, तर 27 मॅच हारल्या आहेत.
त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय विक्रमाबद्दल बोलायचे तर त्याने संघासाठी 50 पैकी 30 सामने जिंकले आहेत. 16 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. कसोटीमध्ये, कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने 65 पैकी 38 कसोटी जिंकल्या आहेत. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्यांना 16 कसोटीत पराभव पत्करावा लागला आहे.
2022 मध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. टीम इंडियाने 2007 पासून टी-20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यानंतर 2023 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप भारतातच खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला 2013 पासून आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मुंबई इंडियन्ससाठी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या रोहितकडून सगळ्यांना खूप आशा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india, Virat kohli