बीसीसीआयची गुगली, प्रशिक्षकपदावरून कुंबळेंना हटवणार ?

कुंबळेंना सध्या वर्षभरासाठी 6.25 कोटींचं मानधन मिळतं. यात कुंबळेंना आणखी 20 टक्के वाढवून हवे आहेत. त्यामुळे बीसीसीआय ही मानधन वाढ करून देण्यास तयार नाहीये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 07:05 PM IST

बीसीसीआयची गुगली, प्रशिक्षकपदावरून कुंबळेंना हटवणार ?

25 मे : चॅम्पियन ट्राॅफी खेळण्यासाठी भारतीय टीम लंडनमध्ये दाखल झालीये. मात्र टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर बीसीसीआय नाराज असल्याचं समोर आलंय. एवढंच नाहीतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकासाठी शोधाशोध सुरू केलाय.

बीसीसीआयने टाकलेल्या गुगलीमुळे टीम इंडियामध्ये खळबळ उडालीये. बीसीसीआयने एक पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यात जुलै महिन्यापासून मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहे. हे जरी खरं असलं तरी अनिल कुंबळेंना अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. पण, ऐन चॅम्पियन्स ट्राॅफीच्या तोंडावर बीसीसीआयने कोच बदलाची हालचाल सुरू केल्यामुळे खळबळ उडालीये.

बीसीसीआयकडून कुंबळेंवर दबाव ?

प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचा करार हा जून 2017 पर्यंत आहे. परंतु, कुंबळेंना मानधनात वाढ हवी आहे. कुंबळेंना सध्या वर्षभरासाठी 6.25 कोटींचं मानधन मिळतं. यात कुंबळेंना आणखी 20 टक्के वाढवून हवे आहेत. त्यामुळे बीसीसीआय ही मानधन वाढ करून देण्यास तयार नाहीये. त्यामुळेच बीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास सुरुवात केलीये.

बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज

Loading...

विशेष म्हणजे बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज आहे. बीसीसीआयचे अधिकारी चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यास नकार देत होते. तेव्हा कुंबळेंनी सुप्रीम कोर्टाने स्थापन करून दिलेल्या संचालक समितीला टीम इंडिया खेळण्यासाठी तयार आहे अशी माहिती कळवली होती. त्यामुळे बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज झाले.

...म्हणून कुंबळे प्रशिक्षक झाले

मागील वर्षी अनिल कुंबळेने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचे सूत्र हाती घेतले होते. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या आग्रहाखातर कुंबळे प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले होते. सुरुवातील बीसीसीआयने कुंबळेंना प्रशिक्षकपदासाठी अपात्र ठरवलं होतं. पण तिन्ही मित्रांच्या दबावामुळे कुंबळे तयार झाले होते. याआधी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे कुंबळेंच्या मानधनापेक्षा 75 लाख जास्त घेत होते. तरी सुद्धा कुंबळेंनी प्रशिक्षकपदाचा करार केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...