Home /News /sport /

...तोपर्यंत भारतीय टीममध्ये निवड होणार नाही, BCCI ने पृथ्वी शॉला दिला थेट इशारा

...तोपर्यंत भारतीय टीममध्ये निवड होणार नाही, BCCI ने पृथ्वी शॉला दिला थेट इशारा

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) आणि त्याआधी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) निवड झाली नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 मे : आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) आणि त्याआधी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) निवड झाली नाही. शॉला भारतीय टीममध्ये संधी का मिळाली नाही, याचं कारण आता समोर आलं आहे. पृथ्वी शॉला भारतीय टीममध्ये परतायचं असेल, तर त्याला वजन कमी करावं लागेल, असं निवड समितीचं म्हणणं आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, पृथ्वी शॉ 21 वर्षांचा असूनही तो संथ आहे, त्याला वजन कमी करावं लागेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या फिल्डिंगबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्याच्या एकाग्रतेत कमतरता जाणवली होती. पण ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर पृथ्वी शॉने आपल्या खेळात सुधारणा केली. पृथ्वी शॉच्या आधी ऋषभ पंत (Rishabh Pant) यालाही वजन कमी करायला सांगण्यात आलं होतं. आयपीएलच्या मागच्या मोसमात वाढलेल्या वजनामुळे आणि खराब फॉर्ममुळे ऋषभ पंतवर जोरदार टीका झाली होती. यानंतर ऋषभ पंतने वजन कमी केलं, ज्याचा फायदा त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाला. एकवेळ पंतला तिन्ही फॉरमॅटमधून डच्चू मिळाला होता, पण उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पंत टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. पृथ्वी शॉला ऋषभ पंतच्या पावलावर पाऊल टाकावं लागेल, असं बोर्डाच्या सूत्राने सांगितलं. तसंच शॉला पुढच्या काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल., कारण एका सीरिजमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची टीम इंडियामध्ये निवड होते, पण या संधीचं त्याला सोनं करता येत नाही, म्हणूनच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला संघर्ष करावा लागतो. पृथ्वी शॉचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणं फार सोपं नाही, कारण कोरोना व्हायरसमुळे भारतात स्थानिक क्रिकेट खेळलं जात नाही, त्यामुळे त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी नाही, पण त्याला स्वत:च्या फिटनेसवर काम करण्यासाठी नक्कीच वेळ मिळेल. पृथ्वी शॉने यावर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करत तब्बल 827 रन केले होते. स्पर्धेच्या इतिहासात ही सर्वाधिक धावसंख्या होती. विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात पृथ्वी शॉने तीनवेळा 150 रनचा टप्पा ओलांडला होता. याशिवाय आयपीएलमध्येही तो शानदार फॉर्ममध्ये होता. आयपीएलच्या 8 सामन्यांमध्ये त्याने 166.48 च्या स्ट्राईक रेटने 308 रन केले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Prithvi Shaw, Team india

    पुढील बातम्या