मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup ची सगळ्यात मोठी UPDATE, BCCI ने ICC ला सांगितलं...

T20 World Cup ची सगळ्यात मोठी UPDATE, BCCI ने ICC ला सांगितलं...

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup) भारतात आयोजन होणार आहे, पण देशातल्या कोरोना संकटामुळे या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, पण वर्ल्ड कपचं आयोजन दुसऱ्या देशात झालं तर आम्हाला काहीही हरकत नाही, पण आयोजनाचे अधिकार आमच्याकडेच असावेत, अशी मागणी बीसीसीआयने (BCCI) आयसीसीकडे (ICC) केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 जून : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup) भारतात आयोजन होणार आहे, पण देशातल्या कोरोना संकटामुळे या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, पण वर्ल्ड कपचं आयोजन दुसऱ्या देशात झालं तर आम्हाला काहीही हरकत नाही, पण आयोजनाचे अधिकार आमच्याकडेच असावेत, अशी मागणी बीसीसीआयने (BCCI) आयसीसीकडे (ICC) केली आहे. 1 जूनला झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयला वर्ल्ड कप आयोजनाबाबत 28 जूनपर्यंतची वेळ दिली होती.

वर्ल्ड कपमध्ये 16 टीम सहभागी होणार आहेत. याचे सुरुवातीचे सामने ओमानमध्येही होऊ शकतात. 4 मे रोजी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर आता आयपीएलचे (IPL 2021) उरलेले 31 सामने युएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, 'हो आम्हाला औपचारिकरित्या वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. पण जर स्पर्धा देशाबाहेर नेण्याचा निर्णय घेण्यात आला, तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत. याबाबत आयसीसीला सांगण्यात आलं आहे, पण आयोजनाचे अधिकार आमच्याकडेच असावेत, अशी आमची अट आहे.' याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

एकीकडे वर्ल्ड कप आयोजनाबाबत साशंकता असतानाच आता ओमान क्रिकेट बोर्डानेही वर्ल्ड कपचं आयोजन आमच्याकडे करण्यात यावं, अशी मागणी केली आहे. याचा निर्णय बीसीसीआय आणि आयसीसीने घ्यावा, असं ओमान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी सांगितलं.

'वर्ल्ड कपचे सुरुवातीचे सामने ओमानमध्ये होतील, तर युएईमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा सुरू होईल. आयपीएल 10 ऑक्टोबरला संपेल, त्यामुळे ओमानमध्ये सामने झाले तर वर्ल्ड कपसाठी खेळपट्टी तयार करायला युएईला तीन आठवड्यांचा वेळ मिळेल. टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 45 मॅच होणार आहेत,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

'ऑक्टोबर मधली भारताची कोरोनाची स्थिती तुम्ही जून महिन्यात कशी सांगू शकता? सप्टेंबर महिन्यात 8 टीमची आयपीएल खेळवण्यात अडचणी येत असतील, तर ऑक्टोबर महिन्यात 16 टीमचा वर्ल्ड कप कसा खेळवता येऊ शकतो?. आयपीएलप्रमाणे जर एखाद्या टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर, प्रत्येक टीमकडे 14-15 खेळाडूच उपलब्ध असतील, त्यामुळे टीमना खेळाडू निवडण्यासाठी पर्यायही उपलब्ध नसेल,' असं वक्तव्य अधिकाऱ्याने केलं.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Icc, T20 world cup