नवी दिल्ली, 18 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. त्यामुळं चहुबाजूंनी विराटच्या कर्णधारपदावर टीका होत आहे. त्यानंतर बीसीसीआयच्या काही सुत्रांनी, आता टीम इंडिया विराट कोहलीला नाही तर, रोहित शर्माला कर्णधार बनवणार असल्याचे तसेच त्यांच्यात दुरावा आल्याचे सांगितले होते. त्यामुळं भारतीय संघात विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या सगळ्या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. बीसीसीआयच्या संघ व्यवस्थापनाच्या अहवालात वेगळा खुलासा करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या अहवालात भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात कोणत्याच प्रकारचा दुरावा नसल्याचे संघ व्यवस्थापनाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. टाईम्य ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार या अहवालात, " विराट आणि रोहित यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा या खोट्या आहेत. संघात गटबाजी असल्याच्या केवळ बातम्या पसरवण्यासाठी करण्यात आल्या होत्या. हे अतिशय दुर्दैवी आहे", असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा- BCCIचा विराट कोहलीला धक्का; प्रशिक्षक निवडीतून केले बाजूला!
रोहित-विराटमध्ये होता दुरावा?
वर्ल्ड कपनंतर एका वृत्तसंस्थेने, भारतीय संघ सध्या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे, असे वृत्त दिले होते. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री चर्चा न करता निर्णय घेतात, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे. त्यामुळं रोहितकडे संघाचे कर्णधारपद जाणार अशी चर्चा होती.
वाचा- BCCIचा मास्टरप्लॅन, रवी शास्त्रीचा खेळ होणार खल्लास!
अशी होती संघात गटबाजी
सुत्रांच्या माहितीनुसार क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. त्यामुळेच आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता.
वाचा- सचिन, गांगुली नाही तर 'हे' तीन दिग्गज क्रिकेटपटू निवडणार भारताचे नवे कोच
देवदूत मोटरमन; ...अन्यथा 500 फूट खोल दरीत कोसळली असती एक्स्प्रेस