शास्त्रींचा पत्ता होणार कट? प्रशिक्षकासाठी 6 दिग्गज शर्यतीत

भारताच्या क्रिकेट संघासाठी बीसीसीआयनं प्रशिक्षकाची शोधमोहिम सुरू केली असून त्यासाठी अर्ज मागवले होते. लवकरच प्रशिक्षकासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे

  • Share this:

ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत आहे. मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते.अर्ज करण्याची मुदत संपली आहे. आता लवकरच मुलाखत होणार आहे.

कोहलीने पुन्हा एकदा रवी शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आनंद होईल असं म्हटलं होतं. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी मुलाखती घेण्यात येतील तेव्हा रवी शास्त्री वेस्ट इंडीजमध्ये असणार आहेत. त्यांची मुलाखत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून होईल.

रवी शास्त्री बीसीसीआयच्या नव्या अटीमध्येसुद्धा बसतात. त्यांचे वय सध्या 57 वर्ष आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकासाठी कमाल वयाची मर्यादा 60 वर्ष ठेवली आहे. जर शास्त्रींशिवाय दुसरा कोणी प्रशिक्षक झालाच तर यामध्ये काही दिग्गज शर्यतीत आहेत.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी हे आहेत. त्यांनी 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये लंकेला अंतिम फेरीत पोहचवलं होतं. त्यानंतर 2012 पासून टॉम मूडी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हैदराबादनं 2016 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. 53 वर्षांच्या मूडी यांचं वय 53 असून 8 कसोटी आणि 76 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.

वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्यांदा न्यूझीलंडला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंड़चे माजी प्रशिक्षक माइक हसन हेसुद्धा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनी न्यूझीलंडशिवाय अर्जेंटीना आणि केनियालासुद्धा प्रशिक्षण दिलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्यांदा न्यूझीलंडला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंड़चे प्रशिक्षक माइक हसन हेसुद्धा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनी न्यूझीलंडशिवाय अर्जेंटीना आणि केनियालासुद्धा प्रशिक्षण दिलं आहे.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेसुद्धा भारताच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून माहेला जयवर्धने मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने दोनवेळा विजेतेपद पटकावलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जयवर्धनेनं 600 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्याच्या या अनुभवाचा संघाला फायदा होईल.

लालचंद राजपूत यांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. त्यांनी भारताचे संघ व्यवस्थापक म्हणून काम केलं आहे. राजपूत गेल्या चार वर्षांपासून झिम्बॉम्बे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. झिम्बॉम्बे क्रिकेटला आयसीसीने निलंबित केलं आहे. सध्या ते कॅनडातील ग्लोबल टी20 लीगमध्ये विनिपेग हॉक्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहेत.

भारताचे माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंगसुद्धा प्रशिक्षकाच्या शर्यतीत आहेत. त्यांनी भारताकडून एक कसोटी आणि 136 एकदिवसीय सामने खेळले आहेत. रॉबिन सिंग यांनी 1989 मध्ये पदार्पण केलं होतं तर 2001 मध्ये निवृत्ती घेतली होती. अष्टपैलू खेळाडू असलेल्या रॉबिन सिंग यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 हजार 336 धावा आणि 69 विकेट घेतल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 08:10 AM IST

ताज्या बातम्या