धोनीसाठी World Cup मध्ये संघाने तडजोड केली? निवड समितीचे अध्यक्ष म्हणतात...

'...तर धोनी आणि जडेजाची न्यूझीलंडविरुद्धची खेळी सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखली गेली असती'

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 09:44 AM IST

धोनीसाठी World Cup मध्ये संघाने तडजोड केली? निवड समितीचे अध्यक्ष म्हणतात...

मुंबई, 1 ऑगस्ट : भारतीय संघाला वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संघाच्या निवड समितीवर अनेकांनी टीका केली होती. विंडीज दौऱ्यासाठी करण्यात आलेल्या निवडीवरूनही टीका झाली. तसेच सेमीफायनलमध्ये धोनीला खालच्या क्रमांकावर पाठवण्यावरूनही प्रश्न उपस्थित केला गेला. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवड समितीलाच धारेवर धरलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघाची बिकट अवस्था झाली असताना धोनी आणि जडेजाने डाव सावरला. मात्र विजय मिळवून देण्यात दोघेही अपयशी ठरले. त्यानंतर पुन्हा भारताच्या मधल्या फळीचा प्रश्न पुढे आला. यावर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.

आम्ही दिग्गज क्रिकेटपटूंचा आदर करतो. त्यांचा प्रत्येक सल्ला योग्य पद्धतीनं घेतला जातो. त्यांच्याकडं त्यांचा दृष्टीकोन आहे. प्रत्यक्षात त्यांच्याकडून होणाऱ्या टीका दुर्दैवी आहेत. तरीही त्यांच्या टीकांनी खचून न जाता आम्ही मजबूत होतो असं प्रसाद यांनी म्हटलं आहे. एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आलं की, धोनीला संघात ठेवण्यासाठी संघाच्या मधल्या फळीत तडजोड केली का? यावर प्रसाद म्हणाले की, वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर भारताने विजय मिळवला असता तर जडेजा आणि धोनीच्या खेळीला सर्वोत्कृष्ट म्हटलं असतं. आतापर्यंत धोनी मर्यादित षटकांत भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि फिनिशर आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनी यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून संघाची मोठी ताकद होता असंही प्रसाद यांनी म्हटलं आहे.

गावस्करांची निवड समितीवर टीका

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी निवड समितीचे प्रमुख कमकुवत असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी विराटकडेच कर्णधारपद कायम ठेवल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. निवड समिती इतक्या कमी वेळात कशी निवड करते असंही गावस्कर यांनी म्हटलं होतं. निवड समितीत असलेल्या 5 सदस्यांना फक्त 13 कसोटी खेळण्याचा अनुभव आहे.

एमएसके प्रसाद यांचे गावस्करांना उत्तर

Loading...

निवड समितीत असलेल्या सदस्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना प्रसाद म्हणाले की, सर्व सदस्य वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय प्रथम श्रेणीत 477 सामने खेळले आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही सर्वांना मिळून 200 पेक्षा जास्त सामन्यांचा अनुभव आहे. हे आकडे पाहून आम्ही एक खेळाडू आणि निवडकर्ता म्हणून चांगलं कौशल्य ओळखू शकत नाही असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

'मी फक्त संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो', विंडीज दौऱ्याआधी रोहितचे ट्वीट!

निवड समितीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना प्रसाद यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की आमच्या संघाने 13 कसोटी मालिकेपैकी 11 मध्ये विजय मिळवला आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत आयसीसीच्या क्रमवारीत कसोटी संघ नंबर एकवर आहे. जर तुम्ही सर्वाधिक सामने खेळलात त्यावर तुमची योग्यता ठरणार असेल तर इंग्लंडच्या निवड समितीचा अध्यक्ष असलेल्या एड स्मिथकडे फक्त एका कसोटीचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाचे ट्रेवोर होन्स यांच्याकडे 7 कसोटींचा अनुभव असून 128 कसोटी आणि 244 वनडे खेळणाऱे मार्क वॉ त्यांच्या हाताखाली काम करतात. जर त्या देशात पद आणि आंतरराष्ट्रीय अनुभव हा मुद्दा नाही तर आपल्या देशात का नाही असा प्रश्न प्रसाद यांनी उपस्थित केला.

...तर सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाच नसता

निवड समितीचे रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्याशी मतभेद असतील तर काय करता असा प्रश्न प्रसाद यांना विचारण्यात आला होता. त्यावर प्रसाद म्हणाले की, भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार कोहली आणि भारत ए च्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी असलेल्या राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली जाते. निवड समितीची स्वत:ची एक भूमिका आणि जबाबदारी आहे. आम्ही एकत्र मिळून काम करतो. त्यात कोणताही दबाव नसतो. अनेकदा मतभेद होतात पण लोकांपर्यंत पोहचत नाही. शेवटी आम्ही तेच करतो जे संघाच्या आणि देशाच्या हिताचं असतं.

'जास्त खेळले म्हणजे त्यांच्याकडं अधिक क्षमता हा गैरसमज'

लोकांचा गैरसमज आहे की ज्या खेळाडूंनी जास्त क्रिकेट खेळलं आहे ते जास्त समजूतदार आहेत. त्यांच्याकडं अधिक क्षमता आहे पण हे खरं नाही. असं असतं तर निवड समितीत, प्रशिक्षक आणि इतर ठिकाणी फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेले लोक दिसले असते असंही एमएसके प्रसाद म्हणाले.

Ashes : अत्तराच्या बाटलीत राख असेलली प्रतिष्ठेची ट्रॉफी, जाणून घ्या रंजक इतिहास

SPECIAL REPORT: भाजपच्या तोडाफोडीला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची नवी रणनीती, थोरात पवारांच्या भेटीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2019 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...