मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BCCI: बीसीसीआयची 'स्वच्छता मोहीम' सुरु... निवड समिती बरखास्तीनंतर घेणार 'हे' मोठे निर्णय

BCCI: बीसीसीआयची 'स्वच्छता मोहीम' सुरु... निवड समिती बरखास्तीनंतर घेणार 'हे' मोठे निर्णय

बीसीसीआयची 'स्वच्छता मोहीम' सुरु

बीसीसीआयची 'स्वच्छता मोहीम' सुरु

BCCI: शुक्रवारी रात्री बीसीसीआयनं चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त करुन सर्वांनाच धक्का दिला. आता बीसीसीआय पुढच्या काळात अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं टी20 वर्ल्ड कपमधल्या लाजीरवाण्या पराभवानंतर उलथापालथ करण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीआयची ही स्वच्छता मोहीम म्हणजे टीम इंडियाच्या आगामी वन डे आणि टी20 वर्ल्ड कप मिशनची सुरुवात म्हणावी लागेल. शुक्रवारी रात्री बीसीसीआयनं चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त करुन सर्वांनाच धक्का दिला. आता बीसीसीआय पुढच्या काळात अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

निवड समिती बरखास्त

बीसीसीआयच्या निवड समितीत चेतन शर्मा मुख्य सिलेक्टर होते. याशिवाय हरविंदर सिंग, सुनील जोशी, देबाशिष मोहंती या वेगवेगळ्या झोनमधील सदस्यांचा समावेश होता. या सर्वांना बीसीसीआयनं बाहेरचा रस्ता दाखवला. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पराभवानं भारतीय संघव्यवस्थापन आणि निवड समितीवर टीकेची झोड उठली होती. पण त्यानंतर बीसीसीआयनं ठोस पावलं उचलली आहेत आणि त्याची सुरुवात निवड समितीपासून झाली आहे.

हेही वाचा - MS Dhoni: धोनीच्या घरी 'नवी पाहुणी'... शुभेच्छा देण्यासाठी केदार जाधव, ऋतुराज पोहोचले रांचीत; Video

बीसीसीआयचे मोठे निर्णय

निवड समिती बरखास्त केल्यानंतर बीसीसीआयनं लगेचच राष्ट्रीय निवड समिती गठित करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठी 28 नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानंतर अर्जदारांच्या मुलाखती होऊन येत्या जानेवारीपर्यंत नवी निवड समिती स्थापन होईल. या समितीवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. कारण येत्या दोन वर्षात टीम इंडिया दोन वर्ल्ड कप खेळणार आहे. 2023 मध्ये भारतात वन डे वर्ल्ड कपचं आयोजन होत आहे. तर 2024 साली वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.

हार्दिक पंड्या नियमित कर्णधार

मिळालेल्या माहितीनुसार 2024 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात संघाची मोर्चेबांधणी करण्यात येऊ शकते. त्यासाठी पंड्याकडे टी20 फॉरमॅटचं नियमित कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर रोहित शर्मा वन डे आणि कसोटीचा कर्णधार राहील. एकूणच बीसीसीआयमध्ये होणारे हे बदल पाहता येत्या काळात भारतीय संघात प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: BCCI, Cricket, Cricket news, Sports