News18 Lokmat

क्रिकेट सोडून रोहित शर्मा डान्स शिकतोय? पाहा मजेशीर VIDEO

बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत रोहित समोर असलेल्या एका लहान मुलीची डान्स स्टेप फॉलो करताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2019 10:00 AM IST

क्रिकेट सोडून रोहित शर्मा डान्स शिकतोय? पाहा मजेशीर VIDEO

मुंबई, 13 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. पण या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने एकतर्फी झुंज देत दमदार शतक झळकावलं. हिटमॅन रोहित शर्माचा बीसीसीआयने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत रोहित समोर असलेल्या एका लहान मुलीची डान्स स्टेप फॉलो करताना दिसत आहे. 'हिटमॅन फ्लॉस डान्स शिकताना...' अशा कॅप्शनने बीसीसीआयने एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.दरम्यान शनिवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारीतय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Loading...

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ५० षटकांत २५४/ ९ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने भारताचा ३४ धावांनी पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ १- ० ने आघाडीवर आहे. अवघ्या चार धावांमध्येच ३ विकेट गमावणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित शर्मा १३३ आणि धोनीने ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. रोहित आणि धोनीमध्ये चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी झाली. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने धोनीला बाद केले.

शिखर धवन, विराट कोहली आणि अंबाती रायडू अवघ्या चार धावांमध्येच तंबूत परतले. भारताने पहिल्या चार षटकांत ४ धावा काढत ३ विकेट गमावल्या. यातील एक विकेट जेसन बेहरेनडॉर्फने तर दोन विकेट रिचर्डसनने घेतल्या. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात जेसन बेहरेनडॉर्फने पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर शिखर धवनला एलबीडब्ल्यू करत बाद केले.

ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ५ गडी गमावत २८८ धावा केल्या. भारताला पहिला सामना जिंकण्यासाठी ५० षटकांत २८९ धावा करणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियासाठी पीटर हँड्सकॉम्बने सर्वाधिक ७३ (६१) धावा केल्या. त्यानंतर उस्मान ख्वाजा ५९ (८१), शॉर्न मार्श ५४ (७०) यांनी सर्वाधिक धावा केल्या. मर्क्युस स्टोनिस (४७) आणि ग्लेन मॅक्सवेल (११) धावांवर नाबाद राहिले. भारताकडून कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २ गडी बाद केले तर मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाने याआधी कधीही ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ कसोटी मालिकेप्रमाणेच ही एकदिवसीय मालिका जिंकून इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आधीच त्यांच्या ११ खेळाडूंची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाच्या टीम मॅनेजमेंटने ११ खेळाडूंच्या निवडीमध्ये कोणताही नवीन प्रयोग केलेला नाही. त्यांनी भरवशाच्या खेळाडूंनाचं पसंती दिली. यामुळेच युवा खेळाडू एश्टन टर्नरला संघात स्थान देण्यात आलं नाही.


VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयावर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2019 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...