शुद्ध घी विरुद्ध डालडा! द्रविडसोबतच्या फोटोमुळं शास्त्री पुन्हा झाले ट्रोल

शुद्ध घी विरुद्ध डालडा! द्रविडसोबतच्या फोटोमुळं शास्त्री पुन्हा झाले ट्रोल

बीअर बॉटलनंतर आता पुन्हा एकदा रवी शास्त्री झाले ट्रोल.

  • Share this:

बंगळुरू, 20 सप्टेंबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या टी-20 मालिकेत भारतानं विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-20 सामना 22 सप्टेंबरला बंगळुरू येथे होणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात अपेक्षेप्रमाणे युवा गोलंदाजांनी आणि कर्णधार विराट कोहलीनं चांगली खेळी केली. या सगळ्यात सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे ती द्रविड आणि शास्त्री यांच्या फोटोची.

भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अंडर-19चे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक फोटो बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर शेअर केला. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना चिन्नास्वामी मैदानावर होत आहे. यादरम्यान द्रविडनं भारतीय संघाला चिन्नास्वामी मैदानावर भेट दिली.

बीसीसीआयनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये रवी शास्त्री आणि द्रविड एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. यावर सोशल मीडियावर चाहत्यांनी शास्त्रींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

यात द्रविडला शुध्द घी तर शास्त्रींना डालडा अशा नावानं ट्रोल केले आहे. त्याचबरोबर द्रविड आणि शास्त्री दोघ म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकांची माणसं आहेत, अशी कमेंट काही चाहत्यांनी केली आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख आहे. तर, शास्त्री यांची नुकतीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान याआधी शास्त्री यांची वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना हातात बिअरचा ग्लास असल्यामुळं फोटो ट्रोल झाला होता.

तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0नं आघाडी मिळवली आहे. धर्मशाला येथे झालेला पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द झाला होता. तर, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं सात विकेटनं पहिला विजय नोंदवला. दरम्यान शेवटचा टी-20 सामना 22 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. यानंतर दोन देशांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

खड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड! झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण

First published: September 20, 2019, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading