कौन बनेगा ...? पंतसह चार पर्याय, BCCIने शेअर केला VIDEO

कौन बनेगा ...? पंतसह चार पर्याय, BCCIने शेअर केला VIDEO

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही ऋषभ पंत 19 धावा करून बाद झाला. भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

  • Share this:

बेंगळुरू, 23 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा पराभव झाला. फलंदाजी आणि गोलंदाजीतही भारतीय संघ अपय़शी ठरला. या पराभवात फलंदाजांच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे. शिखर धवन वगळता एकाही फलंदाजाला टी20 ला साजेशी खेळी करता आली नाही. ऋषभ पंत पुन्हा मोठी खेळी करू शकला नाही. त्याला 19 चेंडूत 19 धावा करता आल्या.

सामन्याच्या आधी पंतला दिग्गज खेळाडूंनी इशारा दिला होता. फलंदाजीत सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या पंतला त्याच्या कामगिरीमुळे संघातील स्थान गमवावं लागू शकतं. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातही पंत बेजबाबदार फटका मारून बाद झाला. पंतच्या कामगिरीवर याआधी देखील कर्णधार विराट कोहली(Virat Kohli), प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) आणि फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड(Vikram Rathour) यांनी सार्वजनिक वक्तव्य केले होते.

वर्ल्ड कपच्या आधीपासून भारतासमोर मधल्या फळीची डोकेदुखी आहे. त्यात चौथ्या क्रमांकाचा शोध अद्याप सुरू आहे. अजुनही भारताला चौथ्या क्रमांकावर भरवशाचा फलंदाज मिळालेला नाही. यासाठी अनेक प्रयोगही सातत्यानं करण्यात आले. आताही टी20 मध्ये ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळतो. तिसऱ्या टी20 सामन्यात फलंदाजीला उतरल्यावर समालोचन करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी भारताच्या चौथ्या क्रमांकासाठी चार जणांची नावे सुचवली. या चौघांपैकी योग्य पर्याय कोणता असा प्रश्न त्यांनी विचारला. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रश्न कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर त्याच स्टाइलमध्ये विचारला.

चौथ्या क्रमांकावर कोण योग्य खेळाडू? श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांचे पर्याय देण्यात आले आहेत. सामन्यावेळी सुनील गावस्कर यांनी विचारलेल्या या प्रश्नाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पंतने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावं असं एका लेखात म्हटलं होतं.

एमएसके प्रसाद यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, ऋषभ पंतवर आमचं लक्ष आहे. त्याच्यावर पडणाऱा भार पाहता नक्कीच तिन्ही प्रकारात त्याची जागा घेतील अशा खेळाडूंना तयार केलं जात आहे. आमच्याकडं केएल भरत आहे ज्याने इंडिया ए कडून कसोटीत खेळताना चांगली कामगिरी केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इशान किशन, संजू सॅमसन हे दोघे आहेत. हे पर्याय म्हणून असले तरीही पंतवर पूर्ण विश्वास असून यष्टीरक्षक म्हणून त्यालाच पसंती दिली जाईल.

ऋषभ पंतमध्ये प्रतिभा आहे. सध्या तो बेजबाबदार फटके खेळत आहे. त्याला नव्या फलंदाजी प्रशिक्षकांनी सल्ला दिला आहे. तो समजून घेऊन त्यानं खेळावं असं एमएसके प्रसाद यांनी म्हटलं होतं. नवे फलंदाजी प्रशिक्षक राठोड यांनी म्हटलं की, पंतला शिस्त आणि बेजबाबदार फटके यातलं अतंर समजून घ्यायला हवं. या दोघांशिवाय पंतला मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनीही इशारा दिला आहे.

VIDEO: आता पाकिस्तानची खैर नाही; भारत-अमेरिकेची दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 09:18 AM IST

ताज्या बातम्या