मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Cricket New Rule: आयपीएलमध्ये आता खेळू शकेल 'इम्पॅक्ट' प्लेअर, नव्या नियमामुळे प्लेअर्सची होणार चांदी

Cricket New Rule: आयपीएलमध्ये आता खेळू शकेल 'इम्पॅक्ट' प्लेअर, नव्या नियमामुळे प्लेअर्सची होणार चांदी

ऑस्ट्रेलियातील टी-20 लीग बिग बॅशमध्ये (Big Bash X Factor) एक्स फॅक्टर या नावाने हा नियम लागू केला आहे. त्यानुसार प्रत्येक टीम पहिल्या डावातील 10 ओव्हर संपण्यापूर्वी राखीव 4 पैकी कुठल्याही खेळाडूला प्लेईंग 11 खेळाडूंत समाविष्ट करू शकते.

पुढे वाचा ...
मुंबई, 17 सप्टेंबर : बीसीसीआय (BCCI) देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये लवकरच नवे नियम लागू करणार आहे. या नव्या नियमांनुसार आता प्रत्यक्ष टी-20 मॅचमध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याची संधी 15 खेळाडूंनी मिळू शकेल. बोर्ड 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 सैयद मुश्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेपासून इम्पॅक्ट प्लेअर नियम (Impact Player Rule) लागू करू शकतो. या नियमानुसार, मॅच सुरू असताना खेळणाऱ्या 11 खेळाडूंपैकी एकाच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळू शकेल. त्यासाठी टॉस करण्यापूर्वी टीमला संघात खेळाणारे 11 आणि राखीव 4 अशा खेळाडूंची नावं जाहीर करावी लागतील. त्यामुळे हे 15 खेळाडू मॅच (Cricket Match) खेळण्यासाठी पात्र ठरतील. राखीव चौघांपैकी एकाचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून टीम वापर करू शकेल. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने सगळ्या स्टेट एसोसिएशन्सना याबाबतचं सर्कुलर पाठवलं असून, त्यानुसार टी-20 क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता काही नव्या गोष्टी केल्या पाहिजेत असं बोर्डाला वाटतंय. या शॉर्ट फॉरमॅटला चाहत्यांबरोबरच टीम्ससाठी अधिक आकर्षक आणि रंजक करण्यासाठी हे बदल असावेत. नियमानुसार, एका इम्पॅक्ट प्लेअरचा उपयोग दोन्ही टीम मॅचमध्ये एकदाच करू शकतील. बिग बॅश लीगमध्ये लागू आहे हा नियम ऑस्ट्रेलियातील टी-20 लीग बिग बॅशमध्ये (Big Bash X Factor) एक्स फॅक्टर या नावाने हा नियम लागू केला आहे. त्यानुसार प्रत्येक टीम पहिल्या डावातील 10 ओव्हर संपण्यापूर्वी राखीव 4 पैकी कुठल्याही खेळाडूला प्लेईंग 11 खेळाडूंत समाविष्ट करू शकते. त्याच वेळी मॅचमध्ये बॅटिंग करत नसलेल्या किंवा एका ओव्हरपेक्षा जास्त ओव्हर न टाकलेल्या खेळाडूच्या जागी हा नवा खेळाडू येऊ शकतो. बीसीसीआयच्या नियमानुसार, दोन्ही डावांत 14व्या ओव्हरच्या आधी इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करता येऊ शकेल. अंपायरला कल्पना द्यावी लागेल टीमचा कॅप्टन, कोच आणि टीम मॅनेजर यांनी मैदानातील किंवा चौथ्या अंपायरला इम्पॅक्ट प्लेअर खेळवण्याबद्दल आधी माहिती देणं बंधनकारक आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानात आल्यानंतर जो खेळाडू मैदानातून तंबूत (Pavilion) जाईल त्याला त्या मॅचमध्ये खेळता येणार नाही. तो राखीव खेळाडू म्हणून मैदानात फील्डिंगही करू शकणार नाही. बॅटिंग टीमची विकेट पडल्यानंतर किंवा ब्रेकमध्ये टीम आपल्या इम्पॅक्ट प्लेअरला मैदानात उतरवू शकेल. जर एखाद्या बॉलरच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर आणला तर आधीच्या प्लेअरने त्या मॅचमध्ये किती बॉलिंग केली आहे याच्याशी नव्या खेळाडूचा काहीही संबंध नसेल. इम्पॅक्ट प्लेअर पूर्ण 4 ओव्हर्स टाकू शकेल. मॅचवेळी निलंबित केलेल्या खेळाडूच्या बदल्यात इम्पॅक्ट प्लेअर मैदानात उतरू शकणार नाही.
First published:

Tags: BCCI, Cricket, Ipl

पुढील बातम्या