मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BCCI वाढवणार खेळाडूंचा पगार, दिवसाला मिळणार एवढे पैसे!

BCCI वाढवणार खेळाडूंचा पगार, दिवसाला मिळणार एवढे पैसे!

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) अध्यक्षतेखाली बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने स्थानिक खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार खेळाडूंचा दिवसाचा पगार 60 हजार रुपये करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 3 जुलै : सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) अध्यक्षतेखाली बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने स्थानिक खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार खेळाडूंचा दिवसाचा पगार 60 हजार रुपये करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. खेळाडूंची मॅच फी त्यांच्या अनुभवाच्या आधारावर असेल. लवकरच सौरव गांगुली आणि जय शाह मुंबईत या मुद्द्यावर बैठक करतील, यानंतर खेळाडूंना लवकरच खुशखबर मिळेल.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की ज्या खेळाडूंनी 20 किंवा त्यापेक्षा जास्त मॅच खेळल्या असतील तर त्यांचं मानधन 60 हजार रुपये होईल. सध्या या खेळाडूंना 35 हजार रुपये मानधन मिळतं, म्हणजेच बीसीसीआय खेळाडूंच्या पगारात 25 हजारांची घसघशीत वाढ करणार आहे. याशिवाय ज्या खेळाडूंनी 20 पेक्षा कमी सामने खेळले आहेत त्यांना 45 हजार रुपये मिळतील.

2020-21 साली कोरोनामुळे जास्त स्पर्धा झाल्या नाहीत, त्यामुळे या वर्षासाठीही बीसीसीआय खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याच्या विचारात आहे.

याशिवाय बीसीसीआयने स्थानिक खेळाडूंना आणखी एक खूशखबर दिली आहे. या मोसमात भारतात स्थानिक क्रिकेट होणार आहे. यासाठीच्या वेळापत्रकाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. 2021-22 मध्ये एकूण 2,127 स्थानिक मॅच होणार आहेत. यात सगळ्यात महत्त्वाच्या अशा रणजी ट्रॉफीचं आयोजन 16 नोव्हेंबरपासून होणार आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला (Syed Mushtaq Ali Trophy) 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरुवात होईल, तर याची फायनल 12 नोव्हेंबरला खेळवली जाईल. रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) मागचा मोसम रद्द करण्यात आला होता, तर 2019-2020 साली कोरोनामुळे रणजी स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. यावेळचा रणजी मोसम 16 नोव्हेंबर 2021 ते 19 नोव्हेंबर 2022 असे तीन महिने खेळवला जाईल. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) 23 फेब्रुवारी 2022 ते 26 मार्च 2022 या कालावधीमध्ये होईल.

First published:

Tags: BCCI, Cricket, Sourav ganguly