World Cup : क्रिकेटपटूंना पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत राहता येणार पण...

भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर पत्नी आणि गर्लफ्रेंडला सोबत घेण्याची परवानगी दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 03:30 PM IST

World Cup : क्रिकेटपटूंना पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत राहता येणार पण...

नवी दिल्ली, 19 एप्रिल : आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने क्रिकेटपटूंना त्यांच्यासोबत पत्नी आणि गर्लफ्रेंडला घेऊन जाण्याबद्दलची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार कोणत्याही खेळाडूसोबत त्यांच्या कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तीला वर्ल्ड कपच्या दरम्यान 15 दिवसांपेक्षा जास्त वेळ थांबता येणार नाही.

भारतीय संघ ब्रिटनला गेल्यानंतर पहिले 20 दिवस खेळाडूंना कुटुंबीयांना भेटता येणार नाही. त्यानंतर स्पर्धेदरम्यान 15 दिवसांसाठी खेळाडू त्यांच्यासोबत राहू शकतील. याबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्ड कप स्पर्धेच्या कालावधीत कोणत्याही खेळाडूला कुटुंबीयांना वेळ घालवता यावा यासाठीच्या निर्णयावर चर्चा झाली. त्यानंतर 15 दिवसांची मुदत निश्चित करण्यात आल्याचे समजते.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने वर्ल्ड कपवेळी पत्नी, गर्लफ्रेंडला सोबत घेण्यासाठी बीसीसीआयकडे मागणी केली होती. जरी 15 दिवस सोबत राहण्याची परवानगी दिली असली तरी खेळाडूंच्या बसमधून नाही तर त्यांच्यासाठी असलेल्या किंवा खाजगी वाहनातून प्रवास करावा लागेल.

'हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...