News18 Lokmat

INDvsWI : कार्तिकला वगळले, त्याच्या जागी 'या' खेळाडूची वर्णी

वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळू शकला नाही तर अनुभवी खेळाडू म्हणून संघात घेतलेल्या कार्तिकला वेस्ट इंडीज दौऱ्यातून वगळण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 03:59 PM IST

INDvsWI : कार्तिकला वगळले, त्याच्या जागी 'या' खेळाडूची वर्णी

मुंबई, 21 जुलै : वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. तीनही फॉरमॅटमध्ये विराट कोहलीकडे नेतृत्व असणार आहे. वर्ल्ड कपमध्ये निवड झालेल्या यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला मात्र संघातून वगळण्यात आलं आहे. त्याला एकदिवसीय आणि टी20 संघात स्थान मिळू शकलं नाही. यामुळे कार्तिकचं आतंरराष्ट्रीय करिअर आता जवळपास संपुष्टात आलं आहे. सध्या धोनीच्या जागी ऋषभ पंतला संघात संधी देण्यात आली आहे. कार्तिकचे वय 34 वर्ष असल्यानं यापुढे त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळूनही विशेष कामगिरी करता आली नाही. आता वेस्ट इंडीजच्या दौऱ्यातून त्याला वगळल्याने निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.

भारताच्या कसोटी संघात वृद्धीमान साहाची वर्णी लागली आहे. दुखापतीमुळे साहा संघातून दीड वर्ष बाहेर होता. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला दुखापत झाली होती. त्याचा अनुपस्थितीत ऋषभ पंतला संधी मिळाली होती. निवड समितीचे प्रमुखे एमएसके प्रसाद यांनी सांगितलं की, जो वरिष्ठ खेळाडू दुखापतीतून सावरतो त्याला प्राधान्या दिलं जाईल. 34 वर्षीय साहाने 32 कसोटीत 1 हजार 164 धावा केल्या आहेत. तर यष्टीरक्षण करताना 75 झेल आणि 10 स्टम्पिंग केले आहेत.

महेंद्रसिंग धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली असून त्याच्याऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून याआधी धोनीची जागा पंत घेणाऱ असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यापुढे धोनी संघात असला तरी पंतच प्रमुख यष्टीरक्षक म्हणून खेळेल. तर धोनी त्याला मार्गदर्शनासाठी संघात असेल. यामुळे आता कार्तिकला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता मावळली आहे.

मधल्या फळीत केदार जाधवने आपले स्थान कायम राखले आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. तरीही निवड समितीने त्याला पुन्हा संधी दिली. भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल.

World Cup गाजवणाऱ्या खेळाडूवर BCCI करणार कारवाई?

Loading...

गब्बर इज बॅक! वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

VIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...