बीसीसीआयनं अर्जुन पुरस्कारासाठी केली 'या' खेळाडूंच्या नावाची शिफारस

बीसीसीआयनं अर्जुन पुरस्कारासाठी केली 'या' खेळाडूंच्या नावाची शिफारस

महत्त्वाची बाब म्हणजे ज्या चार क्रिकेटरच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे, ते चारही गोलंदाज आहेत.

  • Share this:

मुंबई : बीसीसीआयनं यंदा अर्जुन पुरस्कारासाठी चार क्रिकेटरच्या नावांची शिफारस केली आहे. यात रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी यांच्या नावाचा समावेश आहे. तर, यासोबतच पुनम यादव या महिला क्रिकेटपटूचाही समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला. त्यात अनपेक्षितपणे जडेजाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. शमी आणि बुमराह हे भारताचे प्रमुख गोलंदाज आहे. या दोघांनी मागील काही वर्षांत परदेशात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धींना हतबल केले आहे. बुमराहने अल्पावधीतच भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. बुमराहने 49 वन डे सामन्यांत 85 विकेट्स घेतल्या आहेत. शमीनेही 63 वन डे सामन्यांत 113 विकेट्स नावावर केल्या आहेत.

पुनम यादव या 27 वर्षीय महिला फिरकीपटूनं मागच्या वर्षी भारताला चांगल यश मिळवून दिलं. महिला क्रिकेटमध्ये ती सध्या 10व्या क्रमांकावर आहे. पूनमनं आतापर्यंत 41 एकदिवसीय सामने तर, 54 टी-20 सामने खेळले आहेत.

दरम्यान, अर्जुन पुरस्कार 1961 साली सुरु करण्यात आला होता. अर्जूनाची मुर्ती आणि 5 लाख रुपये रोख असे या बक्षिसाचे स्वरुप आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या चार क्रिकेटरच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे, ते चारही गोलंदाज आहेत.

VIDEO: 'आम्ही भुजबळांची व्यवस्था नीट लावून ठेवली आहे', मुख्यमंत्र्यांचा घणाघात

First published: April 27, 2019, 3:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading