बीसीसीआयकडून धोनीची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

बीसीसीआयकडून धोनीची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

बीसीसीआयकडून यावर्षी फक्त एकाच नावाची शिफारस करण्यात आलीये. महेंद्रसिंग धोनीच्या नावावर २०११चा एकदिवसीय वर्ल्ड कप आणि २००७चा टी-२० वर्ल्ड कप आहे.

  • Share this:

अमित मोडक, 20 सप्टेंबर : भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनीची पद्मभूषण पुरस्कारासाठी   शिफारस केलीये. बीसीसीआयकडून यावर्षी फक्त एकाच नावाची शिफारस करण्यात आलीये. महेंद्रसिंग धोनीच्या नावावर २०११चा एकदिवसीय वर्ल्ड कप आणि २००७चा टी-२० वर्ल्ड कप आहे.

भारताला दोन वेळा वर्ल्ड कप जिंकून देण्याची कामगिरी धोनीनं केलीये. कसोटी,एकदिवसीय आणि टी-२० मध्ये टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. खेलरत्न आणि पद्मश्री पुरस्कार धोनीनं पटकावलेत. पद्मभूषण पुरस्कारासाठी धोनीची निवड झाली तर हा पुरस्कार मिळणारा तो अकरावा क्रिकेटपट्टू ठरेल.

धोनीची कारकीर्द

एकदिवसीय सामने - ३०२,  धावा - 9737

कसोटी सामने - 90 धावा - 4876

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2017 03:04 PM IST

ताज्या बातम्या