मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup 2021 : धोनीला मेंटर करून BCCI ने केली 'चूक', तक्रार दाखल

T20 World Cup 2021 : धोनीला मेंटर करून BCCI ने केली 'चूक', तक्रार दाखल

File Photo

File Photo

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (T20 World Cup Team India) बुधवारी घोषणा करण्यात आली. एमएस धोनीला (MS Dhoni) टीमचं मेंटर करण्यात आलं, यावर आता तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (T20 World Cup Team India) बुधवारी घोषणा करण्यात आली. आर. अश्विनचं (R Ashwin) चार वर्षांनी मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन झालं, तर एमएस धोनीला (MS Dhoni) टीमचं मेंटर करण्यात आलं. एमएस धोनीचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झाल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते आनंदी झाले आहेत, पण आता या घडामोडीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार धोनीच्या नियुक्तीविरोधात परस्पर हितसंबंधांची (कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेश असोसिएशनचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयला पत्र लिहून ही तक्रार केली आहे. एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही, त्यामुळे हा परस्पर हितसंबंधांचा मुद्दा आहे, असा दावा संजीव गुप्ता यांनी केला आहे.

धोनी आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) कर्णधार आहे आणि आता बीसीसीआयने (BCCI) त्याला टीम इंडियाचा मेंटर केला आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय अंडर-19 टीम आणि इंडिया-एचा कोच होण्याआधी आयपीएलच्या सर्व पदांपासून लांब झाला होता.

संजीव गुप्ता यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे तक्रार केली आहे, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या संविधान नियम 38 (4) चा दाखला दिला आहे. या नियमानुसार एक व्यक्ती दोन पदांवर असू शकत नाही, असं संजीव गुप्ता यांनी तक्रारीत म्हणलं आहे. यानंतर आता बीसीसीआय याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार आहेत.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी युएईमध्येच एमएस धोनीशी मेंटर होण्याबाबत चर्चा केली. एमएस धोनीही यासाठी तयार झाला. विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्रीदेखील (Ravi Shastri) एमएस धोनीला मेंटर केल्यामुळे खूश आहेत, अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली. धोनीच्याच नेतृत्वात भारताने 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. 2014 साली भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली, तर 2016 साली सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.

First published:

Tags: MS Dhoni, T20 world cup, Team india