रहाणेला कर्णधारपदावरून हटवल्याने नवा वाद, BCCI म्हणते...

रहाणेला कर्णधारपदावरून हटवल्याने नवा वाद, BCCI म्हणते...

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी राजस्थानने अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून हटवून स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्व दिलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 एप्रिल : राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून हटवून स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्व दिलं आहे. पुढच्या सर्व सामन्यात स्मिथ राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. या निवडीने आता नवा वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयने राजस्थानच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाने स्मिथवर दोन वर्षांची बंदी घालताना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गंत कोणत्याही स्पर्धेत नेतृत्व करता येणार नाही असं म्हटलं होतं. त्याच्यावर एक वर्षांची बंदी घातली होती. ती संपल्यानंतर स्मिथने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आहे. गेल्या वर्षी त्याला संघात घेतले नव्हते. आता त्यांनी कर्णधारपद देताना विचार करायला हवा होता असं बीसीसीआयचं म्हणणं असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितले.

स्मिथवर असलेल्या बंदीमुळे त्याला गेल्या वर्षी संघातून बाहेर ठेवलं होतं. त्याच्या कर्णधारपदावर असलेल्या बंदीचे काय ? ती बंदी निर्णयाचा भाग नाही का? संघाच्या सोयीनुसार असे निर्णय घेतले जाणार का ? असे अनेक प्रश्न असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यापूर्वी राजस्थानने कर्णधार म्हणून स्टीव्हन स्मिथचे नाव जाहीर केले. रहाणेने या हंगामात 8 सामन्यात खेळताना 201 धावा केल्या आहेत तर स्मिथने 7 सामन्यात 186 धावा केल्या आहेत.

पॉइंट टेबल

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

<strong>प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल</strong>

<iframe id="story-364887" class="video-iframe-bg-color iframe-onload" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzY0ODg3/" width="100%" height="150" frameborder="0" scrolling="no"></iframe>

First published: April 21, 2019, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading