कानपूर, 23 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टेस्ट सिरीज 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर #BCCI_Promotes_Halal हा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. कानपूर टेस्ट मॅचपूर्वी खेळाडूंच्या डाएट प्लॅनवरुन क्रिकेट जगतात वादंग निर्माण झाले आहे.
टी 20 सिरीज जिंकल्यानंतर भारतीय संघ टेस्ट मॅचसाठी कानपूर येथे दाखल झाला आहे. हे खेळाडू हॉटेल लँडमार्क टॉवर येथील बायो-बबलमध्ये राहतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय खेळाडूंसाठी फूड मेनूही जारी करण्यात आला आहे. खेळाडूंच्या डाएट प्लॅनवरुन फॅन्स बीसीसीआयवर भलतेच भडकले आहेत.
बीसीसीआयने जारी केलेल्या डाएट प्लॅन नुसार, दिवसभर काउंटर, स्टेडियमवर छोटा नाश्ता, दुपारचे जेवण, चहाच्या वेळी नाश्ता आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश होतो. या मेनूमधून डुकराचे मांस आणि गोमांस वगळण्यात आले आहे. मांसाहारी पदार्थांमध्ये हलाल मांसाचा समावेश करण्यात आला आहे.
त्यावरून फॅन्स भडकले आहेत आणि सोशल मीडियावर बीसीसीआयविरोधात #BCCI_Promotes_Halal ही मोहीम सुरू केली आहे.
मंगळवारी सोशल मीडियावर काही तासांतच या विषयावर १० हजारांहून अधिक लोकांनी ट्विट केले. बहुतांश ट्विट हे हलाल मांसाबाबतचे प्रश्न उपस्थित करत आहेत.
बीसीसीआयला प्रश्न विचारणाऱ्या बहुतांश युजर्स असा तर्क लावत आहेत की, हलाल मांस मुस्लिमांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
इतर धर्माच्या लोकांचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरीकडे क्रिकेट संघात सर्व धर्माचे लोक आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही एका धर्माच्या श्रद्धेबाबत कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. मात्र, सोशल मीडियावर बीसीसीआयने उपस्थित केलेल्या प्रश्नांना अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. बोर्डाने अधिकृतपणे डाएट प्लॅन सांगितलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.