मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

LIVE सामन्यात खेळाडूंचा अपमान मांजरेकरांना नडला, गांगुलीने केली हकालपट्टी

LIVE सामन्यात खेळाडूंचा अपमान मांजरेकरांना नडला, गांगुलीने केली हकालपट्टी

1996मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आहेत.

1996मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आहेत.

1996मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 14 मार्च : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. कोरोनामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम पुढे ढकलण्यात आला असून, भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. मात्र या सगळ्यात बीसीसीआयने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले आहे. बीसीसीआयने समालोचक (commentator) टीममध्ये मोठा बदल केला. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची बीसीसीआयने या टीममधून हकालपट्टी केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तम समालोचक म्हणून ओळख असलेले संजय मांजरेकर यांची बीसीसीआयने हकालपट्टी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र या सामन्यात संजय मांजरेकर समालोचक म्हणून उपस्थित होते. मात्र मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, संजय मांजरेकर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वाचा-VIDEO : कोरोनामुळे क्रिकेटपटूंची फजिती, मैदानात प्रेक्षक नसताना काय घडलं पाहा मांजरेकर यांनी आतापर्यंत 3 वर्ल्ड कपचे समालोचन केले आहे. 1996मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आहेत. मात्र बीसीसीआयने त्यांचा आयपीएलच्या पॅनलमध्येही समावेश केलेला नाही आहे. यामागे त्यांनी समालोचन करताना केलेला खेळाडूंचा अपमान हे कारण असू शकते. संजय मांजरेकर यांनी याआधी रविंद्र जडेजा हा चांगला खेळाडू नसल्याचे मत व्यक्त केले होते. यावरून क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चांगले फैलावर घेतले होते. तसेच, त्यांनी समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले यांचाही अपमान केला होता. वाचा-भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द, कोरोनामुळे BCCI ने घेतला निर्णय बीसीसीआयच्या सुत्रांनी मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली स्वत: समालोचक टीमची निवड करतो. त्यामुळे गांगुलीने मांजरेकर यांच्या वागणुकीला कंटाळून हा निर्णय घेतला असावा. वाचा-BREAKING: कोरोनामुळे IPL लांबणीवर, 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होणार जडेजाचा केला होता अपमान कोलकाता येथे भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या दिवस-रात्र मालिकेदरम्यान मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली होती. मांजरेकर यांनी,"रवींद्र जडेजा हा एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत नाही. असे कधी तरी खेळणारे खेळाडू मला आवडत नाहीत. त्याचबरोबर, तो कसोटी सामन्यात पूर्ण गोलंदाज आहे. 50 षटकांच्या क्रिकेटसाठी मी प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाज किंवा कोणत्याही फिरकी गोलंदाजाचा समावेश करू इच्छितो, पण जडेजाचा नाही", अशा शब्दात टीका केली होती. या वक्तव्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी मांजरेकरांना चांगलेच फैलावर घेतले होते.
First published:

Tags: Cricket, Sanjay manjrekar

पुढील बातम्या