मुंबई, 23 ऑक्टोबर : बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गांगुलीने पत्रकारांशी संवाद सांधला. यावेळी पत्रकारांनी महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला. गांगुली म्हणाला की, धोनी एक चॅम्पियन खेळाडू आहे आणि चॅम्पियन लवकर हार मानत नाहीत. एक वेळ होती की त्याचं करिअर संपुष्टात आलं होतं पण त्याने मेहनत करून पुनरागमन केलं आणि त्यानंतर चार वर्षे क्रिकेट खेळला.
धोनीच्या भविष्याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की, मी अजुन धोनीशी चर्चा केलेली नाही. मी त्याच्याशी चर्चा करेन. त्याच्या पुनरागमनावर सर्व अवलंबून आहे. मला नाही माहिती की त्याच्या मनात काय चाललं आहे. गांगुलीने धोनीचं कौतुक करताना म्हटलं की, धोनीसारखा खेळाडू भारताकडे आहे ही गौरवाची गोष्ट आहे. तुम्ही एकदा बघा त्याने भारतीय क्रिकेटसाठी काय काय केलं आहे
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर जोपर्यंत असेन तोपर्यंत प्रत्येक क्रिकेटपटूला योग्य सन्मान दिला जाईल. आम्ही इथं क्रिकेटपटूंचं जीवन सोपं करण्यासाठी आलो आहे. त्यांना कोणत्याही अडचणी निर्माण करण्यासाठी नाही. सर्वकाही कामगिरीच्या आधारावर होईल आणि यासाठी सर्वाचे मत विचारात घेतले जाईलं असंही गांगुलीने सांगितलं.
#WATCH from Mumbai: Sourav Ganguly addresses media after taking over as the BCCI President. https://t.co/q8djFRhPhX
— ANI (@ANI) October 23, 2019
गांगुली गुरुवारी निवड समितीशी चर्चा करणार आहे. यावेळी धोनीच्या निवृत्ती किंवा पुनरागमन हा विषय चर्चेत असेल. वर्ल्ड कपनंतर धोनी मैदानावर दिसलेला नाही. यामुळे तो नक्की काय करणार याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. रांचीविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर धोनीने खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची भेट घेतली होती.
SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, Sourav ganguly