क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, पुन्हा भिडणार भारत-पाक!

क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, पुन्हा भिडणार भारत-पाक!

यावर्षी होणाऱ्या आशियाई कप (Asia Cup) स्पर्धेवरून अनेक वाद झाल्यानंतर अखेर भारत-पाक यांच्यात सामना होणार आहे.

  • Share this:

कोलकाता, 29 फेब्रुवारी : यावर्षी होणाऱ्या आशियाई कप (Asia Cup) स्पर्धेवरून अनेक वाद झाल्यानंतर अखेर भारत-पाक यांच्यात सामना होणार आहे. आशियाई कपचे यजमानपद पाकला देण्यात आले होते, मात्र सुरक्षेच्या कारणावरून भारतासह इतर देशांनी पाकमध्ये सामने खेळण्यास नकार दिला. त्यामुळं यंदाचा आशियाई कप दुबईमध्ये होणार आहे. येथेच भारत-पाक (India vs Pakistan) सामना खेळला जाणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. भारत-पाक यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. कारण दोन्ही देशांमधील शेवटची मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर पाकिस्तान संघ तीन वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात आला. दोन्ही संघांचा शेवटचा कसोटी सामना 13 वर्षांपूर्वी 2007 मध्ये खेळला गेला होता. त्यामुळं केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाक एकमेकांविरुद्ध भिडतात.

वाचा-'पांड्या इज बॅक' धमाकेदार प्रदर्शन करत जिंकून दिला सामना, भारताचे 2 दिग्गज फेल

आशिया कप ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने पाकिस्तानला भेट देणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर ही स्पर्धा दुबईला होणार असल्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला. पुढील महिन्यात एशियन क्रिकेट कौन्सिलची बैठक 3 मार्च रोजी दुबई येथे होणार आहे आणि बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी दुबईला जाण्यापूर्वी ईडन गार्डन्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पाकिस्तानने या स्पर्धेचे आयोजन केले तरी बीसीसीआयला कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा-न्यूझीलंडमध्ये असलेल्या टीम इंडियाला कोरोनाचा धोका? रुग्ण सापडल्याने खळबळ

सप्टेंबरमध्ये होणार आशिया कप होणार आहे

काही काळापासून दोन्ही देशांमधील खराब संबंधांमुळेही क्रिकेटवर परिणाम झाला आहे आणि 2012-2013 पासून दोन्ही देशांमधील कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. दोन्ही संघांमधील सामनाही फक्त आयसीसी स्पर्धेत दिसून येतो. सप्टेंबरमध्ये आशिया कप होणार आहे. गतविजेता भारतीय संघ पुन्हा एकदा आशिया कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

वाचा-आर. अश्विन शोधतोय नोकरी? CV पोस्ट केला पण एक गोष्ट 'लपवली'

First published: February 29, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या