Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटची चिंता वाढली! गांगुलीनं काढले कोहली विरोधात फर्मान

विराटची चिंता वाढली! गांगुलीनं काढले कोहली विरोधात फर्मान

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गांगुलीनं घेतली सर्वांची शाळा.

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गांगुलीनं घेतली सर्वांची शाळा.

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गांगुलीनं घेतली सर्वांची शाळा.

मुंबई, 17 ऑक्टोबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. गांगुली अध्यक्ष झाल्यामुळं सर्वांनी त्याचे कौतुक केले असले तरी, भारतीय संघाच्या आणि विराट कोहलीच्या चिंता वाढल्या आहेत. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच गांगुलीनं टीम इंडिया विरोधात फर्मान काढले आहे की, त्यांनी आता मोठया स्पर्धांकडे आपले लक्ष केंद्रित करावे.

वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनल सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर टीम इंडियानं संघात काही बदल केले. दरम्यान त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघानं शानदार कामगिरी विंडिजला क्लिन स्विप दिला.

आता सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटी मालिका खेळत आहेत, त्यातही भारतीय संघानं 2-0नं मालिका आपल्या खिशात घातली. त्यामुळं सध्या भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. पुढच्या वर्षी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे. त्यामुळं गांगुलीनं या दोन स्पर्धांसाठी तयारी करण्याचे फर्मान काढले आहे.

वाचा-धोनीबाबत काय घेणार निर्णय? गांगुली म्हणाला त्याला विचारणार की...

‘टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे’

पत्रकारांशी बोलताना सौरव गांगुलीनं, “बीसीसीआयचे अध्यक्ष ही मोठी जबाबदारी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटही तेवढेच महत्त्वाचे आहे. भारतीय क्रिकेटचा प्रमुख आधार प्रथम श्रेणी क्रिकेट आहे. आपण फक्त भारतीय संघावर लक्ष देत आहोत. त्यामुळं प्रथम श्रेणी क्रिकेट भारतासाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे”, असे सांगितले.

‘मोठ्या स्पर्धांकडे लक्ष द्यायची गरज’

गांगुलीनं टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक करत, “मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली असते मात्र सेमीफानयल आणि फायनल सामन्यांत संघ पराभूत होतो. त्यासाठी विशेष योजना अंमलात आणायची गरज आहे. त्यावर भर देण्याची गरज आहे”, असा सल्लाही दिला. तसेच, विराटबाबत सांगताना, “विराट देशाची शान आहे. कोणत्याही दबावाशिवाय तो काम करेल. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप हे एकमेव ध्येय असले पाहिजे”, असे मत व्यक्त केले.

वाचा-‘गांगुली होता म्हणून भारतानं पाकिस्तानला नमवलं’, माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट

24 ऑक्टोबरला घेणार धोनीबाबत निर्णय

24 ऑक्टोबरला निवड समितीशी बैठकीत त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर माझं मत सांगेन असं गांगुलीने स्पष्ट केलं. बैठकीनंतर बांगलादेशसाठी टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. तसेच गांगुलीनं, “निवड समिती धोनीबाबत काय विचार करत आहे हे जाणून घ्यायचं आहे. त्यानंतरच मी माझं म्हणणं सांगेन. तसेच, धोनीचा काय विचार आहे हे देखील बघावं लागेल. मला त्याला विचारायचं आहे की त्याला काय हवं आहे आणि काय नको?”, असे सांगितले.

वाचा-अमित शहांसोबत झालेल्या बैठकीवर सौरभ गांगुलीने केला पहिल्यांदाच खुलासा!

भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

First published:

Tags: Sourav ganguly, Virat kohali