नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नवा अध्यक्ष सौरव गांगुलीनं युवा खेळाडूंना मोठे गिफ्ट दिले आहे. सौरव गांगुलीनं अध्यक्षपदाचा कारभार स्विकारताच क्रिकेटपटूंसाठी वेगवेगळे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी गांगुलीनं भारत-बांगलादेश यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान आता युवा खेळाडूंसाठी गांगुलीनं मोठं पाऊल उचललं आहे.
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनं लवकरच प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकरिताही करार असणार आहे. या करारा अंतर्गत या खेळाडूंना पगार किंवा फी मिळणार आहे. नवी व्यवस्थेनुसार युवा खेळाडूंना वित्तीय सुरक्षा देण्याचा निर्णय गांगुलीनं घेतला आहे.
गांगुलीनं यासंबंधी, “प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही वेगवेगळ्या समस्या असतात. त्याचबरोबर खेळाडूंनी फी वाढवण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी ज्या श्रेणीमध्ये मानधन दिले जाते, तसाच प्रकार प्रथम श्रेणीमध्ये होणार आहे”, असे सांगत युवा खेळाडूंना मालामाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रथम श्रेणीमध्येही खेळाडूंशी होणार करार
बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी प्रथम श्रेणीमध्ये कराराची व्यवस्था करणार असल्याचे सांगितलेय वित्त समितीला हे करार करण्याचे सांगितले असल्याचे गांगुली यांनी सांगितले. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, त्यानुसार खेळाडूंनी मानधन दिले जाणार आहे. सध्या प्रथम श्रेणीमध्ये खेळाडूंना वर्षाला 25-30 लाख रुपये मिळतात. यात खेळाडूंनुसार 35 हजार दिवसाला दिले जातात. आता खेळाडूंची विभागणी केल्यानंतर त्यांचे मानधन ठरवले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंना करारानुसार मिळते मानधन
भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी करार करण्यात आले आहे. सध्या बीसीसीआयच्या वतीनं ए प्लस, ए, बी, आणि सी असे करार केले आहेत. यानुसार खेळाडूंना मानधन दिले जाते. या श्रेणींमध्ये असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये वर्षाला मिळतात.
गांगुलीनं घेतला डे-नाईट कसोटी सामन्यांचा निर्णय
भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होण्याची शक्यता आहे. हे गुलाबी पर्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भारतीय संघ आपला पहिला डे/नाईट कसोटी(Day- Night Test) सामना इडन गार्डन्सवर खेळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)ने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला 22 ते 26 नोव्हेंबर या काळात इडन गार्डन्सवर होणारा सामना डे/नाईट प्रकारात खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार आम्ही यावर काम करत आहोत. पण बीसीसीआयच्या या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sourav ganguly