मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Team India च्या परफॉर्मेंसवर अखेर Sourav Gangulyनी सोडले मौन, 'खेळाडू मुक्तपणे...

Team India च्या परफॉर्मेंसवर अखेर Sourav Gangulyनी सोडले मौन, 'खेळाडू मुक्तपणे...

sourav ganguly

sourav ganguly

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly ) यांनी पहिल्यांदाच T20 वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीबाबत विधान केले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 5 डिसेंबर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly )यांनी पहिल्यांदाच T20 वर्ल्डकपमधील भारताच्या (Team India)कामगिरीबाबत विधान केले आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या ICC T20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पहिल्या फेरीतून बाद झाला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा संघ हा वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरला. गेल्या पाच वर्षांतील कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारताची ही सर्वात वाईट कामगिरी असल्याचे बीसीसीआय(sourav ganguly on team india performance, t20 world cup) अध्यक्षांचे मत आहे.

2017 पर्यंत भारतीय संघ चांगला होता

2017 व 2019 च्या आयसीसी स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली. असे मत गांगुली यांनी Backstage with Boria या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. प्रामाणिकपणे सांगायचं तर 2017 व 2019 च्या आयसीसी स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. जेव्हा पाकिस्तानने ओव्हलवर टीम इंडियाचा पराभव केला, तेव्हा मी समालोचक होतो, त्यानंतर इंग्लंडमध्ये 2019 च्या विश्वचषकात आम्ही उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वांना हरवले पण न्यूझीलंडकडून आम्हाला अखेर हार पत्करावी लागली. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर मी निराश झालो. मागील 4-5 वर्षांतील भारतीय संघाची ही सर्वात खराब कामगिरी होती,''असे मत गांगुलीने यावेळी व्यक्त केले.

यंदाच्या वर्ल्डकमध्ये 'खेळाडू मुक्तपणे...

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही, असे गांगुलीला वाटते. पाकिस्तानने भारताला 10 विकेट्स राखून पराभूत केलं, तर न्यूझीलंडनंही 8 विकेट्सनं विजय मिळवला. या दोन दारूण पराभवानंतर भारतीय संघाला मोठा धक्काच बसला. गांगुली म्हणाला,''मला यामागचं कारण माहित नाही, परंतु भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही. मोठ्या स्पर्धेत असं कधीकधी होतं, तुम्ही खूप दडपण घेता. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेचा 15% खेळ केला.'' संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी अतिशय लाजिरवाणी होती. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात किवी संघाने भारताचा ५ विकेट्स राखून पराभव केला. सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताला पुन्हा विश्वचषकात पुनरागमन करता आले नाही. भारतीय क्रिकेट इतिहासात नऊ वर्षांनंतर असे घडले की जेव्हा टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचू शकली नाही. त्यानंतर भारताने इतर संघांविरुद्ध सलग तीन सामने जिंकले पण ते अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी अपुरे ठरले.
First published:

Tags: Sourav ganguly, T20 world cup

पुढील बातम्या