Home /News /sport /

'टीम इंडियातलं स्थान वाचवायचं असेल तर...', गांगुलीचं दोन भारतीय खेळाडूंना अल्टिमेटम!

'टीम इंडियातलं स्थान वाचवायचं असेल तर...', गांगुलीचं दोन भारतीय खेळाडूंना अल्टिमेटम!

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आता दोन भारतीय खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या काही काळापासून टीम इंडियात संघर्ष करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळून रन केले, तर ते पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकतात, असं गांगुली म्हणाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 फेब्रुवारी : दोन वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धा खेळवली जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मागचे दोन वर्ष भारतातली सगळ्यात मोठी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी खेळवली गेली नव्हती. यावेळची रणजी ट्रॉफी दोन राऊंडमध्ये होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस रणजी ट्रॉफीचा पहिला राऊंड सुरू होईल, तर आयपीएलनंतर (IPL) नॉकआऊट राऊंड खेळवला जाईल. रणजी ट्रॉफी ही अनेक भारतीय क्रिकेटपटूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडते, तसंच अनुभवी क्रिकेटपटू रणजी ट्रॉफी खेळून आपला हरवलेला फॉर्म पुन्हा मिळवतात. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आता दोन भारतीय खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या काही काळापासून टीम इंडियात संघर्ष करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळून रन केले, तर ते पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकतात, असं गांगुली म्हणाला आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गांगुली म्हणाला, 'ते खूप चांगले खेळाडू आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये जाऊन ते बऱ्याच रन करतील, अशी माझी आशा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून पुन्हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला जाण्यात मला कोणतीही अडचण दिसत नाही. रणजी ट्रॉफी एक मोठी स्पर्धा आहे. आम्ही सगळ्यांनी ही स्पर्धा खेळली आहे. ते दोघंही रणजी ट्रॉफी खेळतील आणि चांगली कामगिरी करतील. ते जेव्हा भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळत होते, तेव्हाही त्यांनी रणजी खेळली होती, त्यामुळे यात त्यांना अडचण असेल, असं मला वाटत नाही.' सौरव गांगुलीचं हे वक्तव्य म्हणजे रहाणे आणि पुजारा या दोघांना अल्टिमेटम असल्याचं बोललं जातंय. चेतेश्वर पुजाराने अखेरचं शतक 2019 साली केलं होतं, तर रहाणेने डिसेंबर 2020 साली शेवटचं शतक ठोकलं होतं. भारताची पुढची टेस्ट सीरिज आता श्रीलंकेविरुद्ध आहे, या सीरिजसाठी दोघांची निवड होणं जवळपास अशक्य आहे. रहाणे-पुजारा आमने-सामने रणजी ट्रॉफीतील एलिट ग्रुपच्या मॅच 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सीरिज 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या सीरिजपूर्वी निवड समितीचं लक्ष वेधण्यासाठी त्यांना किमान 2 संधी आहेत. अहमादाबादमध्ये मुंबई विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात हे दिग्गज एकमेकांच्या विरूद्ध  खेळू शकतात.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Pujara, Sourav ganguly, Team india

    पुढील बातम्या